Home ब्रेकिंग न्यूज Ranbir Kapoor : ‘बुराई चाहे कितनी भी…”; दसरा कार्यक्रमातील वक्तव्यावरून रणबीर कपूर ट्रोल

Ranbir Kapoor : ‘बुराई चाहे कितनी भी…”; दसरा कार्यक्रमातील वक्तव्यावरून रणबीर कपूर ट्रोल

0
Ranbir Kapoor : ‘बुराई चाहे कितनी भी…”; दसरा कार्यक्रमातील वक्तव्यावरून रणबीर कपूर ट्रोल
'बुराई चाहे कितनी भी..."; रणबीर कपूरच्या दसरा कार्यक्रमातील विधानावरून नव्या वादाला तोंड ( photo x)

Ranbir Kapoor: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, दसऱ्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सत्य आणि चांगुलपणाच्या विजयाबाबत बोलताना रणबीरच्या तोंडून चुकीचे शब्द निघाल्याचा दावा केला जात आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला टीकेचा सामना करावा लागला. त्यानंतर रणबीरने ही अनावधानाने झालेली शाब्दिक चूक असल्याचे स्पष्ट करत माफी मागितल्याचे वृत्त आहे.

नेमकं काय म्हणाला रणबीर कपूर?

20 ऑक्टोबर रोजी आयोजित दसरा कार्यक्रमात रणबीर कपूरने भाषण केले. दसरा हा सण वाईट प्रवृत्तीवर चांगुलपणाच्या विजयाचा संदेश देतो, असे सांगताना त्याच्याकडून शब्दांची चूक झाल्याचे वृत्त आहे. ‘शेवटी सत्य आणि चांगुलपणाचा विजय होतो’ असे म्हणण्याऐवजी त्याच्या तोंडून ‘सत्य आणि चांगुलपणाचा अंत होईल’ असे शब्द निघाल्याचा दावा केला जात आहे. (Ranbir Kapoor Video)

या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली. विशेषतः ‘रामायण’ चित्रपटात भगवान श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याकडून असे वक्तव्य कसे झाले, असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला.

रणबीरने दिले स्पष्टीकरण

या प्रकरणावरून टीका सुरू झाल्यानंतर रणबीर कपूरने ही केवळ बोलताना झालेली चूक असल्याचे स्पष्ट केल्याचे वृत्त आहे. त्याचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता, असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, काही चाहत्यांनी त्याच्या समर्थनार्थ भूमिका घेत ही अनावधानाने झालेली चूक असल्याचे म्हटले आहे.

21 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ‘रामायण’ चित्रपटाच्या संगीत कार्यक्रमादरम्यान आणि संपूर्ण संगीत अल्बमच्या लाँचप्रसंगीही या विषयावर रणबीरने स्पष्टीकरण दिल्याचे वृत्त आहे.

‘रामायण’ चित्रपटात रणबीर साकारणार श्रीरामाची भूमिका

रणबीर कपूरच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या चित्रपटात रणबीर भगवान श्रीरामाच्या भूमिकेत, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. यश रावणाची, सनी देओल हनुमानाची आणि रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे.

दसरा कार्यक्रमातील वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर आता रणबीरच्या स्पष्टीकरणावर आणि आगामी चित्रपटावर चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here