Home क्रीडा हरभजन सिंगचा खळबळजनक गौप्यस्फोट; ‘तो’ भारतीय क्रिकेटचा सर्वात काळा काळ, ग्रेग चॅपेलने…

हरभजन सिंगचा खळबळजनक गौप्यस्फोट; ‘तो’ भारतीय क्रिकेटचा सर्वात काळा काळ, ग्रेग चॅपेलने…

0
हरभजन सिंगचा खळबळजनक गौप्यस्फोट; ‘तो’ भारतीय क्रिकेटचा सर्वात काळा काळ, ग्रेग चॅपेलने…
हरभजन सिंगचा ग्रेग चॅपेल यांच्यावर गंभीर आरोप

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने ग्रेग चॅपेल यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळावर गंभीर आरोप करत मोठा खुलासा केला आहे. 2005 ते 2007 दरम्यानचा हा काळ भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट आणि काळा काळ असल्याचे सांगत, चॅपेल यांनी संघात ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण राबवल्याचा खळबळजनक दावा त्याने केला आहे.

‘फोडा आणि राज्य करा’चे धोरण

प्रखर गुप्ता यांच्या पॉडकास्टवर बोलताना हरभजन सिंगने चॅपेल यांच्या कार्यकाळातील ड्रेसिंग रूममधील कटू आठवणींना उजाळा दिला. चॅपेल यांनी सौरव गांगुली यांच्याशी केलेल्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त करत, त्यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती हा व्यवस्थापनाचा चुकीचा निर्णय असल्याचे म्हटले. चॅपेल यांनी खेळाडूंमध्ये आपापसात आपापसात भांडणे लावली, ज्यामुळे एकेकाळी एकसंध असलेला संघ पूर्णपणे विस्कळीत झाला. 2003 विश्वचषकानंतर खेळाडूंमध्ये असलेले घट्ट नाते संपले आणि खेळाडू एकमेकांशी बोलणेही टाळू लागले.

https://www.prahaar.in/2026/10/22/nitish-kumar-reddy-celebrates-free-hit-catch-funny-moment-ind-vs-nz/

ऑस्ट्रेलियाचा फायदा व्हावा म्हणून रचला कट?

हरभजनच्या मते, त्या काळातील भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला तगडी टक्कर देत होता. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन वंशाच्या चॅपेल यांनी भारतीय संघाला कमकुवत करण्यासाठी जाणीवपूर्वक ड्रेसिंग रूममध्ये फूट पाडली. खेळाडू एकसंध राहिले नाहीत तर ते मैदानावर कामगिरी करू शकणार नाहीत आणि याचा थेट फायदा ऑस्ट्रेलियन संघाला मिळेल, असा हा मोठा डाव असल्याचा संशय त्याने व्यक्त केला.

2007 च्या विश्वचषकातील मानहानीकारक पराभव

या अंतर्गत वाद आणि गटबाजीतून भारतीय संघाची झालेली वाताहत 2007 च्या एकदिवसीय विश्वचषकात स्पष्टपणे दिसून आली. 2003 मध्ये उपविजेतेपद पटकावणारा भारतीय संघ 2007 मध्ये पहिल्याच फेरीत म्हणजेच गट फेरीत स्पर्धेतून बाहेर पडला. बांगलादेशविरुद्ध झालेला अनपेक्षित पराभव हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा धक्का मानला जातो, ज्याची पाळेमुळे चॅपेल यांच्या काळात रोवली गेल्याचा आरोप हरभजनने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here