मुंबई: साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या दसरा सण अलीकडेच महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात साजरा केला. दसरा सणाच्या आणि नवरात्रीच्या दिवसांमध्ये ग्राहक मोठ्या प्रमाणावर नवीन वस्तू खरेदी करतात. नवीन कार, दुचाकी किंवा घराची खरेदी करण्याचा लोकांचा मोठ्या प्रमाणावर कल असतो. महाराष्ट्रामध्ये यंदा नवरात्री उत्सवादरम्यान 1 लाख 12 हजार 814 वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. यंदाचा आकडा जरीही जास्त असला तरीही तो गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 2 % ने कमी आहे. अपुरा पाऊस, दुष्काळ आणि जागतिक आर्थिक परिस्थितीतील अनिश्चितता ही या घसरणी मागील कारणे असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. नवीन नोंदणीमध्ये दुचाकी आणि खाजगी वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वाटा राहिला, नवरात्रीच्या दिवसांमध्ये पुणेकरांनी सर्वाधिक म्हणजेच, 12,752 वाहने खरेदी केले आहेत.
https://www.prahaar.in/2026/10/22/maharashtra-infrastructure-projects-historic-mou-fly-ash-utilisation/
राज्य परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नोंदणीमध्ये मोपेड वगळून 77,449 खाजगी दुचाकी आणि 25,536 खाजगी कारचा समावेश आहे. ही आकडेवारी महाराष्ट्रातील 60 प्रादेशिक परिवहन कार्यालयांची (RTO) आहे. गेल्या वर्षी नवरात्रीदरम्यान राज्यात 1 लाख 15 हजार 125 वाहनांची नोंदणी झाली होती, यंदा सणासुदीच्या काळात तब्बल 2 % घट दर्शवते. अनेक ग्राहक कार आणि दुचाकी आगाऊ बुकिंग करून ठेवतात आणि दसऱ्याच्या दिवशी कार किंवा दुचाकी आपल्या घरी घेऊन येतात. साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी अनेक लोकं वाहने आणि इतर मालमत्ता खरेदीसाठी दसऱ्याचा दिवस शुभ प्रसंग मानला जातो. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षीचा आकडा जरीही कमी असला तरीही हा आकडा खूप मोठा आहे.
https://www.prahaar.in/2026/10/22/ashok-kharat-trouble-mounts-for-the-fraudulent-ashok-kharat-hearing-on-framing-of-charges-adjourned-until-the-27th/
उत्सवादरम्यान पुण्यामध्ये सर्वाधिक वाहनांची नोंदणी करण्यात आलेली आहे. त्याखालोखाल पिंपरी- चिंचवडमध्ये 8,887 वाहनांची नोंदणी झाली. ठाण्यात 4,474, तर नाशिकमध्ये 4,024 वाहनांची नोंदणी करण्यात आल्या आहेत. मुंबईच्या चार आरटीओंनी मिळून या कालावधीत 13,160 वाहनांच्या नोंदी केल्या आहेत. यामध्ये मुंबई सेंट्रल 3,856 नोंदणींसह शहरात आघाडीवर होते, त्याखालोखाल वडाळा 3,586, बोरिवली 3,206 आणि अंधेरी 2,512 नोंदणी करण्यात आली आहे. राज्य परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये जरीही वाहनांच्या खरेदीमध्ये हजारोच्या संख्येने घट झाली असली तरीही, मुंबई महानगर प्रदेशात वाहनांच्या खरेदीची संख्या लक्षणीय राहिली आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवड मिळून 21,639 वाहनांच्या नोंदणी करण्यात आल्या आहेत. सणासुदीच्या काळात वाहनांच्या नोंदणीच्या बाबतीत बाजी मारली आहे.
https://www.prahaar.in/2026/10/22/transport-minister-pratap-sarnaik-warning-st-bus-depot-cleanliness/
महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनांच्या खरेदीमध्ये झालेली ग्रामीण आणि शहरी आर्थिक घटकांच्या एकत्रित परिणामाशी झालेली घट एकत्रित जोडली जाण्याची शक्यता आहे. कमी पाऊस आणि दुष्काळामुळे ग्रामीण भागातील लोक नवीन वाहने खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे. तर जागतिक आर्थिक परिस्थितीतील अनिश्चिततेमुळे शहरी केंद्रांमधील खरेदीच्या निर्णयांवर परिणाम झाली असण्याची शक्यता आहे. विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की सणासुदीच्या काळात मागणी मोठ्या प्रमाणात कायम राहिली, परंतु मागील वर्षाच्या तुलनेत झालेली घट असे सूचित करते की, जेव्हा कौटुंबिक आर्थिक स्थिती आणि आर्थिक आत्मविश्वास दबावाखाली असतो, तेव्हा केवळ शुभ खरेदीच्या तारखा वाढ टिकवून ठेवण्यासाठी पुरेशा ठरू शकत नाहीत.