Home साप्ताहिक अर्थविश्व शेअर बाजाराला विजयादशमीचा मोठा झटका की कोटींची संधी? जाणून घ्या आज काय सुरू आणि काय बंद

शेअर बाजाराला विजयादशमीचा मोठा झटका की कोटींची संधी? जाणून घ्या आज काय सुरू आणि काय बंद

0
शेअर बाजाराला विजयादशमीचा मोठा झटका की कोटींची संधी? जाणून घ्या आज काय सुरू आणि काय बंद
आज शेअर बाजाराला सुट्टी (फोटो सौजन्य: ANI)

आज विजयादशमीनिमित्त देशवासी एकीकडे दसऱ्याचा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा करत आहेत, तर दुसरीकडे गुंतवणूकदारांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आज विजयादशमीच्या निमित्ताने देशातील प्रमुख शेअर बाजार म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) पूर्णपणे बंद राहणार आहेत. सणाच्या या दिवशी नियमित व्यवहार ठप्प झाल्यामुळे शेअर बाजारातील उलाढाल चार दिवसांवर सीमित झाली आहे. मात्र, या सुटीच्या वातावरणातही गुंतवणूकदारांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची खूशखबर आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच एमसीएक्स (MCX) मधील संध्याकाळच्या सत्रात कमोडिटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्सचे व्यवहार सायंकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11.30 आणि 11.55 पर्यंत सुरळीत सुरू राहणार आहेत. त्यामुळे या सुटीच्या दिवशीही सोने-चांदी आणि कमोडिटी बाजारात पैसे कमावण्याची मोठी संधी गुंतवणूकदारांना उपलब्ध होणार असून, सणासुदीच्या काळातही बाजारातील काही मोजकी दालने खुली राहिल्याने गुंतवणूकदारांमध्ये कमालीचे कुतूहल पाहायला मिळत आहे.

कोणत्या सेगमेंटमध्ये व्यवहार बंद आणि कुठे सुरू?

सविस्तर माहितीनुसार, आज विजयादशमीच्या सुटीमुळे बीएसई आणि एनएसईमधील इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज, म्युच्युअल फंड्स तसेच कॉर्पोरेट बाँड्सचे सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहतील. असे असले तरी, एमसीएक्समधील सायंकाळच्या सत्रातील व्यवहारांमुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

https://www.prahaar.in/2026/10/19/angel-one-us-stocks-investment-offer-google-apple/

आगामी सुट्ट्या आणि दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगची उत्सुकता

ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंतीनंतर विजयादशमीची ही दुसरी मोठी सुटी आहे. तसेच पुढील काळात नोव्हेंबरमध्ये बळीप्रतिपदा आणि गुरु नानक जयंतीनिमित्त बाजार बंद राहील. यंदा दिवाळी रविवारी येत असली तरी, शेअर बाजारात नेहमीप्रमाणे विशेष ‘मुहूर्त ट्रेडिंग’ दुपारी 2.20 वाजता आयोजित केले जाणार आहे, ज्याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here