Home एक्सक्ल्युजिव्ह BMC : पवई तलाव चक्क ३२ टक्के गाळाने भरला; पाणलोट क्षेत्रात पाण्याचे प्रमाण झाले कमी

BMC : पवई तलाव चक्क ३२ टक्के गाळाने भरला; पाणलोट क्षेत्रात पाण्याचे प्रमाण झाले कमी

0
BMC : पवई तलाव चक्क ३२ टक्के गाळाने भरला; पाणलोट क्षेत्रात पाण्याचे प्रमाण झाले कमी
पवई तलाव (फोटो सौजन्य: ANI)

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील गाळाचे आतापर्यंत ११ ते १२ टक्के असतानाच मुंबईतील पवई तलावातील गाळाचे प्रमाण मात्र चक्क ३२ टक्के असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पवई तलावातील पाण्याचे क्षेत्र हे ३२ टक्क्यांनी कमी झाले आहे. तलावातील गाळ काढण्यासाठी तांत्रिक अभ्यास सुरु करण्यात आला आहे. यासाठी आयआयटी मुंबईच्या मदतीने पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे. पवई तलाव हा मुंबई उपनगर परिसरातील एक प्रमुख तलाव असून तलावाचे जलक्षेत्र सुमारे ५५७ एकर असून त्याची परिधीय लांबी सुमारे १०.२ किलोमीटर आहे आणि तलावाची पाणी साठवण क्षमता अंदाजे ५४५५ दशलक्ष लीटर इतकी आहे. पवई तलावातील गाळाचे परिमाण काढण्यासाठी महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) नाशिक या संस्थेसोवत पत्र व्यवहार केलेला होता. त्यानुसार माहे मार्च- एप्रिल २०२४ मध्ये मुंबई महापालिका आणि मेरी नाशिक आणि हायड्रोग्राफिक सर्वेक्षण गृह विभाग (बंदरे आणि परिवहन) महाराष्ट्र सागरी मंडळ जल आलेखक विभाग, मुंबई या विभागांकडून संयुक्तरित्या डीजीपीएस बेस्ड बॅथीमेट्री या तंत्रज्ञानाचा वापर करून गाळ सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आणि याबाबतचा गाळ सर्वेक्षण अहवाल प्राप्त झालेला आहे.

या प्राप्त झालेल्या अहवालानुसार पवई जलाशयाची एकूण साठवण क्षमता ५.४५५ दशलक्ष घनमीटरपासून ३.६९३ दशलक्ष घनमीटर इतकी कमी झालेली आहे, म्हणजेच तलावाची पाणी साठवण क्षमता ३२.३० टक्क्यांनी कमी आली.

https://www.prahaar.in/2026/10/17/bmc-vidyavihar-railway-bridge-cost-escalation-route-change/

पवई तलावातील गाळ काढणे बाबत 

पवई तलावातील गाळ काढणे बाबत व्यवहार्यता तपासणेकरीता स्वयंसेवी संस्था मेसर्स ग्रीन यात्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तलावातील गाळ काढण्यासाठीची तांत्रिक पद्धती ठरविणे आणि काढलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी विविध तांत्रिक बाबी तपासण्यासाठी आय. आय. टी., मुंबई या संस्थेतील तज्ञ सल्लागार आणि हे काम करत असताना तलावातील जैव विविधता, जलचर इ. ना धोका उद्भवू नये याकरिता बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. सद्यस्थितीत ग्रीन यात्रा यांचेमार्फत टप्पा १ अंतर्गत काम सुरू करण्यात आलेले आहे.

महानगरपालिकेच्या विविध विभागांनी हाती घेतलेली पवई तलाव पुनरुज्जीवन संदर्भातील मे पूर्ण झाल्यानंतरच तलावातील पाण्यासाठी आधुनिक जलशुद्धीकरण तंत्रज्ञान राबविणे किंवा प्रयावत जलशुद्धीकरण केंद्र उभारणे आणि तलावातील पाण्याचा संभाव्य वापर पिण्यासाठी नवा इतर नागरी वापरासाठी तातडीने उपलब्ध करून देणे याविषयी तांत्रिक बाबी तपासूनच कार्यवाही करण्यात येईल अशाप्रकारचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पवई तलावाचे पाणी अपेय असून तलावाच्या पाण्याचा वापर पिण्यायोग्य नसलेल्या कामांसाठी, म्हणजेच आरे मिल्क हैअरीसाठी बागकाम आणि जनावरांच्या खाद्यासाठी, तसेच एल अँड टी कंपनीस औद्योगिक वापरासाठी एकूण १०.३ दशलक्ष लीटर प्रतिदिन इतक्या प्रमाणात केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here