Home ब्रेकिंग न्यूज Maharashtra weather : महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, उकाडाही कायम

Maharashtra weather : महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, उकाडाही कायम

0
Maharashtra weather : महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, उकाडाही कायम

मुंबई : राज्यात मान्सूनचा हंगाम संपल्यानंतर उन्हाचा चटका वाढला असून, ऑक्टोबर हिटमुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उष्ण आणि दमट हवामानामुळे दिवसा तापमानात वाढ जाणवत आहे. दरम्यान, येत्या 2 ते 3 दिवसांत राज्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. 14 ऑक्टोबर रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि इतर विभागांत हवामान वेगवेगळे राहण्याचा अंदाज आहे.

कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्ण व दमट वातावरण राहू शकते. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. या भागात कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या भागांत कमाल तापमान 32 ते 34 अंश, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. त्यामुळे उन्हाचा त्रास कायम राहण्याची शक्यता आहे.

https://www.prahaar.in/2026/10/13/central-railway-24-special-trains-dhamma-chakra-pravartan-din-timetable/

पुणे, सातारा आणि घाटमाथ्याच्या परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी सरी पडू शकतात. मात्र, अहिल्यानगर, सांगली आणि सोलापूरमध्ये प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. या भागातील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. जालना आणि बीडमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. या विभागात कमाल तापमान 35 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता असून, किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. येथे कमाल तापमान 35 ते 36 अंश, तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

एकूणच, राज्यात सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता नसून काही भागांतच हलक्या सरींचा अंदाज आहे. वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे आणि दुपारच्या वेळी उन्हात जाणे शक्यतो टाळावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here