Home ब्रेकिंग न्यूज Nalasopara fire : नालासोपाऱ्यात इम्पीरियल हाइट्स इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू

Nalasopara fire : नालासोपाऱ्यात इम्पीरियल हाइट्स इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू

0
Nalasopara fire : नालासोपाऱ्यात इम्पीरियल हाइट्स इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू
नालासोपाऱ्यात इम्पीरियल हाइट्स इमारतीला भीषण आग; महिलेचा मृत्यू, अनेकांना रुग्णालयात दाखल (Photo ANI)

नालासोपारा : मुंबईजवळील नालासोपारा येथील इम्पीरियल हाइट्स ( Imperial Heights) इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. इमारतीत काही रहिवासी अडकल्याने अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू  झाल्याची प्राथमिक माहिती वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली आहे. आगीमुळे त्रास झालेल्या अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा-वसई लिंक रोडवरील इम्पीरियल हाइट्स इमारतीला रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, 15 ते 20 जणांना इमारतीतून बाहेर काढण्यात आले. (Nalasopara fire)

आगीमुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. त्यामुळे रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. काही जण जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या बाहेरील बाजूस मदतीची वाट पाहत उभे असल्याचे दिसून आले. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी क्रेन आणि उंच शिड्यांचा वापर केला. बचाव पथकांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.

आगीत एकाचा मृत्यू

या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, इतर बाधितांची प्रकृती आणि आगीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वसई-विरार महानगरपालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त संजय हरवाडे आणि भाजप आमदार स्नेहा पंडित यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली. पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथकांकडून मदत व बचावकार्य सुरू ठेवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here