मुंबई: विद्या बालनच्या गाजलेल्या ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सुपरहिट चित्रपटाचा आता सिक्वेल तयार होणार आहे. चित्रपटाची निर्माती एकता कपूरने ‘द डर्टी पिक्चर 2’च्या निर्मितीला दुजोरा दिला आहे.
https://www.prahaar.in/2026/10/12/from-the-end-to-the-beginning-sunny-deols-action-film-announced-lucne-vedhalan-lakshya-in-surya/
गेल्या अनेक वर्षांपासून एकता कपूर या चित्रपटाच्या सीक्वेलच्या तयारीत होती. मात्र, जोपर्यंत मनासारखी आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे कथानक हाती येत नाही, तोपर्यंत पुढे न जाण्याचा त्यांचा निर्णय घेतला होता. आता त्यांच्याकडे अशी एक कथा तयार आहे, जी मोठ्या पडद्यावर आणली पाहिजे, असे त्यांना वाटते. हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे सांगत त्यांनी तब्बल 15 वर्षांनंतर या चित्रपटाच्या निर्मितीची जोरदार तयारी सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे.
मूळ चित्रपटामध्ये विद्या बालन यांनी दक्षिण भारतीय अभिनेत्री सिल्क स्मिता यांच्या जीवनापासून प्रेरित झालेली अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह आणि तुषार कपूर यांनीही महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या होत्या. मात्र, आगामी सिक्वेलमध्ये कोणते कलाकार झळकणार, त्याचे दिग्दर्शन कोण करणार आणि चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार, याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
https://www.prahaar.in/2026/10/12/if-nana-patekar-were-in-his-place-netizens-react-to-big-bs-gesture-on-his-birthday-what-exactly/
या नव्या चित्रपटाची कथा एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या जीवनावर आधारित असेल, अशी माहिती एकता कपूरने दिली आहे. पहिल्या भागाप्रमाणेच चित्रपटाचा सिक्वेल सुद्धा बॉक्स ऑफिस गाजवणार, अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली जात आहे. चित्रपटाच्या घोषणेमुळे सिनेसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.