Home क्रीडा W, W, W..! मुंबईच्या तुषार देशपांडेचा चंदीगडला दणका, टॉप ऑर्डर फलंदाजांना एका पाठोपाठ एक धक्के

W, W, W..! मुंबईच्या तुषार देशपांडेचा चंदीगडला दणका, टॉप ऑर्डर फलंदाजांना एका पाठोपाठ एक धक्के

0
W, W, W..! मुंबईच्या तुषार देशपांडेचा चंदीगडला दणका, टॉप ऑर्डर फलंदाजांना एका पाठोपाठ एक धक्के
W, W, W..! मुंबईच्या तुषार देशपांडेचा चंदीगडला दणका, टॉप ऑर्डर फलंदाजांना एका पाठोपाठ एक धक्के (Photo: @tushardeshpande_24 Instagram)

रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरू झाली असून या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने कमाल केली. तुषार देशपांडेच्या भेदक गोलंदाजीमुळे चंदीगडचा संग बॅकफूटवर गेला. तुषार देशपांडेने आपल्या सहाव्या षटकात चंदीगडला बॅकफूटवर ढकललं. त्याने अर्जुन आझाद, शिवम भांबरी आणि दीपेंद्र कुश यांना धडाधड तंबूचा रस्ता दाखवला. यासह आपल्या नावावर या रणजी पर्वातील पहिली हॅटट्रीक नोंदवली. मुंबईच्या इतिहासात सहाव्यांदा अशी कमाल झाली आहे. म्हणजेच मुंबईसाठी हॅटट्रीक घेणारा सहावा गोलंदाज ठरला आहे. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करातना 429 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना चंदीगडचा संघ 78 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे चंदीगडचा संघ 351 धावांनी पिछाडीवर राहिला आणि फॉलोऑन दिला. या धावा पूर्ण करून विजयासाठी धावा देण्याचं दडपण आता चंदीगड संघावर आहे. मात्र दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा चंदीगडने शून्य धावांवर एक विकेट गमावली. पहिल्या डावात तुषार देशपांडेने 7 षटकात 17 धावा देत 5 गडी बाद केले.

तुषार देशपांडेने अशी घेतली हॅटट्रीक

चंदीगडची 16 धावांवर पहिली विकेट पडली होती. अर्सलान खान 2 धावा करून बाद झाला. ही विकेट तुषार देशपांडेने काढली होती. त्यानंतर चंदीगडच्या 25 धावा असताना तुषार देशपांडेच्या हाती चेंडू सोपवला. त्यानंतर चंदीगडचा संघ पूर्णत: बॅकफूटवर गेला. संघाचं 11 वं आणि वैयक्तिक सहावं षटक टाकताना तुषार देशपांडेने अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. तुषार देशपांडेने या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अर्जुन आझादची विकेट काढली. अर्जुन आझाद 33 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या शिवम भाम्बरी आणि दिपेंदर कुश यांना खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे या पर्वातील पहिल्या हॅटट्रीकची नोंद केली. पुढच्या षटकात पुन्हा एकदा तुषार देशपांडेला यश मिळालं. त्याने राज बावाची विकेट काढली आणि पाच विकेट पूर्ण केल्या.

https://www.prahaar.in/2026/10/12/what-is-the-point-of-playing-the-ranji-tournament-dilip-vengsarkar-lashes-out-at-the-bcci/

मुंबईसाठी हॅटट्रीक घेणारे गोलंदाज

  • मुंबईसाठी आतापर्यंत सहा गोलंदाजांनी हॅटट्रीक घेतली आहे.
  • मुंबईसाठी पहिली हॅटट्रीक जहांगीर खोतने घेतली आहे. त्याने विवेक हजारे, सुब्बन्ना नायडू आणि महिपतराव इंदुलकर यांची विकेट काढली.
  • उमेश कुलकर्णीने गुजरातविरुद्ध जीतू पटेल, रूसी सुरती आणि धीमंत अरूण यांची विकेट काढत हॅटट्रीकची नोंद केली.
  • अब्दुल इस्माईलनेही मुंबईसाठी हॅटट्रीक घेतली आहे.
  • 2023-24 मध्ये रॉयस्टन डायसने बिहारविरुद्धच्या सामन्यात आशुतोष अमन, हिमांशु सिंह आणि वीर प्रतीप सिंह यांची विकेट काढत हॅटट्रीक नोंदवली होती.
  • रणजी ट्रॉफी 2025 मध्ये शार्दुल ठाकुरने मेघालयविरुद्ध हॅटट्रीकची नोंद केली होती. त्याने बालचंदर अनिरुद्ध, सुमित कुमार आणि जसकीरत सिंह यांची विकेट काढली होती.
  • आता तुषार देशपांडेने चंदीगडविरुद्ध हॅटट्रीक घेतली असून सहावा गोलंदाज ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here