Home क्रीडा एक वेळ अशी होती जेव्हा मी…! सारा तेंडुलकरचा फोटो शेअर करत सचिनने दिल्या शुभेच्छा

एक वेळ अशी होती जेव्हा मी…! सारा तेंडुलकरचा फोटो शेअर करत सचिनने दिल्या शुभेच्छा

0
एक वेळ अशी होती जेव्हा मी…! सारा तेंडुलकरचा फोटो शेअर करत सचिनने दिल्या शुभेच्छा
एक वेळ अशी होती जेव्हा मी...! सारा तेंडुलकरचा फोटो शेअर करत सचिनने दिल्या शुभेच्छा (Photo: Instagram)

क्रिकेटचा देव म्हणून ख्याती असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी साराचा आज वाढदिवस.. सारा तेंडुलकरने 12 ऑक्टोबर रोजी वयाची 29 वर्षे पूर्ण केली. तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांचा पूर आला आहे. इन्स्टाग्रामवर चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचंही नाव आहे. सचिन तेंडुलकर यांनी आपल्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मनाचा ओला कोपरा उघड केला. साराच्या वाढदिवसानिमित्त वडील या नात्याने सचिन तेंडुलकरने एक भावुक करणारी पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये सचिन तेंडुलकर यांनी लिहिलं की, एक वेळ अशी होती जेव्हा मी तुला मार्ग दाखवयचो. सचिन तेंडुलकरची ही पोस्ट सोशल मीडियावर लक्षवेधी ठरली आहे. या पोस्टखाली सारा आणि सचिनच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या पोस्टवर लाखो लोकांनी लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय लिहिलं आहे सचिन तेंडुलकरने?

सचिन तेंडुलकरने साराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोत सारा तेंडुलकर मराठमोळ्या गेटअपमध्ये दिसत आहे. तर सचिन तेंडुलकरने कुर्ता घातला आहे. हो फोटो पोस्ट करताना सचिन तेंडुलकर कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘एक वेळ अशी होती की मी तुला मार्ग दाखवायतो. आता असं होत नाही. तू कुठे जायचं निवडतेस हे पाहून मला आनंद होतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सारा. लव्ह यू.’ सचिनच्या या पोस्टचा अर्थ काही जणांना कळला नाही. तर काही जणांनी आपल्या पद्धतीने या पोस्टचा अर्थ घेतला आहे. सचिनच्या पोस्टचा अर्थ असा की, सचिनला सारा आपल्या जीवनातील सर्वाधिक निर्णय हे स्वत: घेत हे पाहून अभिमान वाटतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

https://www.prahaar.in/2026/10/12/ind-vs-wi-series-after-the-conclusion-of-the-third-t20-match-shreyas-iyer-assessed-the-scenario-for-the-remaining-two-games-saying/

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सक्रिय

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सक्रिय असते. ती आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बहुतांश गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यामुळे तिने एखादी पोस्ट की चाहते त्याखाली भरभरून प्रतिक्रिया देतात. इंस्टाग्रामवर सारा तेंडुलकरचे 98 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहे. यावरून तिची लोकप्रियता दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here