Home ब्रेकिंग न्यूज Nobel Prize 2026 : अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर! कोण आहेत रॉबर्ट हॉल आणि मायकेल वुडफोर्ड?

Nobel Prize 2026 : अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर! कोण आहेत रॉबर्ट हॉल आणि मायकेल वुडफोर्ड?

0
Nobel Prize 2026 : अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर! कोण आहेत रॉबर्ट हॉल आणि मायकेल वुडफोर्ड?
मायकल वूडफोर्ड आणि रॉबर्ट ई. हॉल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

स्टॉकहोम: अमेरिकेतील प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना 2026 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने सोमवारी स्टॉकहोम येथे या दोन्ही अर्थशास्त्रज्ञांच्या नावांची घोषणा केली. ‘समष्टि-अर्थव्यवस्थेच्या स्थिरीकरणाचा सूक्ष्म-अर्थशास्त्रीय पाया’ या विषयावर त्यांनी केलेल्या उल्लेखनीय संशोधनासाठी त्यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

अर्थशास्त्रातील महत्त्वपूर्ण संशोधन

रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांच्या संशोधनामुळे सामान्य नागरिकांचा खर्च आणि कंपन्यांचे निर्णय संपूर्ण अर्थव्यवस्थेवर कशा प्रकारे परिणाम करतात, हे सखोलपणे समजून घेण्यास मोठी मदत झाली आहे. त्यांच्या या सिद्धांतामुळे आर्थिक धोरणांची आखणी करणे अधिक सुलभ झाले आहे.

https://www.prahaar.in/2026/10/10/panama-earthquake-tsunami-warning-9-countries-magnitude/

पुरस्काराची पार्श्वभूमी आणि स्वरूप

अर्थशास्त्रातील या पुरस्काराचे अधिकृत नाव ‘अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेचा अर्थशास्त्रातील पुरस्कार’ असे आहे. स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने 1968 मध्ये याची सुरुवात केली होती. यंदाच्या नोबेल पुरस्कार मालिकेतील ही शेवटची घोषणा ठरली. गेल्या आठवड्यात वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली होती.

यंदाच्या पुरस्काराची एकूण रक्कम 1 कोटी 20 लाख स्वीडिश क्रोनर (अंदाजे 12 लाख अमेरिकी डॉलर) इतकी निश्चित करण्यात आली असून, ही रक्कम विजेत्यांमध्ये विभागून दिली जाईल. 10 डिसेंबर रोजी अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here