Home ब्रेकिंग न्यूज FDA Raids : अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई; 1 कोटींहून अधिकचा साठा जप्त, 13 जण अटकेत

FDA Raids : अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई; 1 कोटींहून अधिकचा साठा जप्त, 13 जण अटकेत

0
FDA Raids : अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई; 1 कोटींहून अधिकचा साठा जप्त, 13 जण अटकेत
फोटो सौजन्य: AI Generated

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात प्रतिबंधित, निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. या धडक कारवाईत राज्यभरातून 1.09 कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, 12 एफ.आय.आर. दाखल करत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय, अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या मुंबईतील 10 प्रसिद्ध खाद्य आस्थापनांचे (हॉटेल/रेस्टॉरंट्स) परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

कारवाईची ठळक वैशिष्ट्ये:

  • एकूण जप्त साठा: 1.39 कोटींपेक्षा जास्त किमतीचा प्रतिबंधित अन्नसाठा.

  • प्रमुख जिल्हे/विभाग: नाशिक, कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती.

  • जप्त केलेले पदार्थ: सुपारी, दूध, पनीर, भगर, फरसाण, ताडी, सोयाबीन तेल, पान मसाला व तंबाखू.

  • मुंबईतील कठोर कारवाई: अस्वच्छता, उंदीर-झुरळे आणि परवान्यांच्या त्रुटींमुळे 10 मोठ्या आस्थापनांचे परवाने रद्द.

नाशिक व नंदुरबारमध्ये कोटींचा साठा जप्त

नाशिक विभागात एफडीएने मोठी कारवाई करत 192.71 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नंदुरबार येथे गोपनीय माहितीच्या आधारे विमल पान मसाला आणि तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर छापा टाकून तब्बल 1 कोटी 69 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

https://www.prahaar.in/2026/10/10/maharashtra-weather-monsoon-ends-heat-wave-yellow-alert-5-districts/

मुंबईतील 10 नामांकित आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई विभागात अन्न सुरक्षेचे नियम आणि स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आढळल्याने 10 आस्थापनांचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये हॉटेल्स, पिझ्झा आऊटलेट्स, केटरर्स आणि डेअरी उत्पादकांचा समावेश आहे:

  1. मे. हुमा केटरर (इस्लाम जिमखाना, मुंबई)

  2. मे. मिल्कौज डेअरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. (कांदिवली)

  3. मे. ला पिनोझ पिझ्झा (सांताक्रूझ पश्चिम)

  4. मे. एफ3 कॉर्पोरेट हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस (विलेपार्ले)

  5. मे. नारायण डोसा (ऑपेरा हाऊस)

  6. मे. अब्रार माईकू खान किराणा स्टोअर (जे. जे. हॉस्पिटल परिसर)

  7. मे. गोल्डन स्टार रेस्टॉरंट-2 (गिरगाव)

  8. मे. सेंट्रल कॅन्टीन (जे. जे. हॉस्पिटल परिसर)

  9. मे. पालीवाल डेअरी (चारकोप, कांदिवली)

  10. मे. नवाब ज्यूस सेंटर (मरीन लाइन्स)

अन्नामध्ये होणारी भेसळ आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर प्रशासनाने फास आवळल्याने अन्न व्यावसायिक वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here