Home ब्रेकिंग न्यूज Nitesh Rane : मंत्री नितेश राणे आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यावर

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यावर

0
Nitesh Rane : मंत्री नितेश राणे आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यावर

सिंधुदुर्ग : मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे आजपासून आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील बंदर विकास, जहाजबांधणी आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राला अधिक चालना देण्याच्या दृष्टीने या दौऱ्याला महत्त्व आहे. या दौऱ्यात नितेश राणे आंध्र प्रदेशातील बंदर विकास आणि जहाजबांधणी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत कार्यपद्धती आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.

मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील आधुनिक पद्धती, मच्छीमारांसाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधी, आर्थिक सक्षमीकरण तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण विषयांवर या दौऱ्यात चर्चा केली जाणार आहे.

आंध्र प्रदेशातील प्रयोगांचा महाराष्ट्राला फायदा

आंध्र प्रदेशात राबवण्यात आलेले यशस्वी प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांचा महाराष्ट्रातील बंदर आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी कसा उपयोग करता येईल, याचा सखोल अभ्यास या दौऱ्यात केला जाणार आहे. महाराष्ट्रातील संबंधित क्षेत्रांच्या विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेऊन, आंध्र प्रदेशातील यशस्वी मॉडेल्स राज्यात राबवण्याच्या दृष्टीने या दौऱ्यात महत्त्वपूर्ण माहिती घेतली जाणार आहे.

नितेश राणे यांनी एक्सवरील पोस्टद्वारे या अभ्यास दौऱ्याबाबत माहिती दिली असून, महाराष्ट्रातील बंदर आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक आधुनिक आणि सक्षम करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here