Home ब्रेकिंग न्यूज Kiara And Siddharth Second Child : ‘कुणीतरी येणार येणार गं…’ कियारा-सिद्धार्थ पुन्हा होणार आई-बाबा; लाडक्या लेकीसोबत केली सेकंड प्रेग्नेंसीची घोषणा!

Kiara And Siddharth Second Child : ‘कुणीतरी येणार येणार गं…’ कियारा-सिद्धार्थ पुन्हा होणार आई-बाबा; लाडक्या लेकीसोबत केली सेकंड प्रेग्नेंसीची घोषणा!

0
Kiara And Siddharth Second Child : ‘कुणीतरी येणार येणार गं…’ कियारा-सिद्धार्थ पुन्हा होणार आई-बाबा; लाडक्या लेकीसोबत केली सेकंड प्रेग्नेंसीची घोषणा!
Kiara And Siddharth Second Child

मुंबई : बॉलिवूडचे लाडके जोडपे अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Adwani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (siddharth Malhotra) यांच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. पहिल्या अपत्यप्राप्तीनंतर अवघ्या एका वर्षाच्या आत या दांपत्याने आपल्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची अधिकृत घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक आणि खास छायाचित्र शेअर करत त्यांनी चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. या बातमीमुळे त्यांचे चाहते आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सिद्धार्थ, कियारा आणि त्यांची पहिली मुलगी साराया (Saraayah) या तिघांचे हात एकत्र दिसत असून, त्यावर लहान बाळाचे मोजे ठेवलेले पाहायला मिळत आहेत. “आम्हाला पुन्हा एकदा आयुष्यातील सर्वात सुंदर भेट मिळाली असून आमचे हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरून आले आहे,” असे सुंदर कॅप्शन त्यांनी या छायाचित्राला दिले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही त्यांनी अशाच अनोख्या शैलीत पहिल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. १५ जुलै २०२५ रोजी कियाराने तिच्या पहिल्या लेकीला जन्म दिला होता.

आपल्या पहिल्या बाळानंतर कियाराने लगेचच कामावर लक्ष केंद्रित केले होते. साऊथचा सुपरस्टार यश याच्यासोबतच्या ‘टॉक्सिक’ या चित्रपटात ती नुकतीच झळकली होती. एका पॉडकास्ट मुलाखतीत मातृत्वाबद्दल बोलताना कियाराने सांगितले होते की, आई झाल्यानंतर तिच्या आयुष्यात आणि स्वभावात प्रचंड बदल झाला आहे. मातृत्वाने तिला अधिक कणखर आणि जबाबदार बनवले असल्याचे तिने नमूद केले होते. आता पुन्हा एकदा हे स्टार कपल आई-बाबा होणार असल्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील या नव्या प्रवासासाठी सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here