Home क्रीडा अजित आगरकर यांचा निवड समिती अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला! बीसीसीआयच्या त्या निर्णयाने चर्चेला उधाण

अजित आगरकर यांचा निवड समिती अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला! बीसीसीआयच्या त्या निर्णयाने चर्चेला उधाण

0
अजित आगरकर यांचा निवड समिती अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला! बीसीसीआयच्या त्या निर्णयाने चर्चेला उधाण
अजित आगरकर यांचा निवड समिती अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला! बीसीसीआयच्या त्या निर्णयाने चर्चेला उधाण (Photo: ANI)

भारतीय संघाच्या निवड समिती अध्यक्षपदावर गेल्या काही वर्षांपासून अजित आगरकर होते. आता त्यांच्या कार्यकाळ संपुष्टात आला, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्याला कारणही तसंच आहे. बीसीसीआयने त्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. पण प्रज्ञान ओझा यांच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकल्याचं बोललं जात आहे. प्रज्ञान ओझा यांना नवीन निवडकर्ता मिळेपर्यंत अंतरिम मुख्य निवडकर्ता म्हणून जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे पार्थिव पटेल याची मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच प्रज्ञान ओझा यांच्याकडेही ही जबाबदारी येऊ शकते, असाही मतप्रवाह आहे. दुसरीकडे, अजित आगरकर यांचा बीसीसीआयसोबतचा करार 4 ऑक्टोबर 2026 रोजी संपत आहे. त्यात त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमीच आहे. भारतीय संघाचे चारही निवड समिती सदस्य सध्या गुवाहाटीत आहेत. मंगळवारी झालेल्या बैठकीत न्यूझीलंड दौऱ्यासाठी कोणत्या खेळाडूंची निवड करायची यावर चर्चा झाली. या बैठकीचं अध्यक्षपद प्रज्ञान ओझाने भूषवलं.

भारत न्यूझीलंड मालिकेसाठी संघाची घोषणा होणार

भारतीय संघ ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. पण या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे मालिका सुरू असून शेवटचा सामना 3 ऑक्टोबरला होणार आहे. ही मालिका संपल्यानंतर म्हणजेच 4 ऑक्टोबर न्यूझीलंड मालिकेसाठी संघाची घोषणा केली जाण्याची शक्यात आहे. यासह अजित आगरकर यांचा कार्यकाळही संपुष्टात येईल, असा दावा क्रिकबझच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

https://www.prahaar.in/2026/09/29/csk-sources-report-that-mohit-sharma-has-been-appointed-as-the-bowling-coach-of-chennai-super-kings/

अजित आगरकर यांची 2023 मध्ये भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या कार्यकाळात भारताने 2024 टी20 वर्ल्डकप, 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2026 मध्ये टी20 वर्ल्डकप जिंकला होता. इतकंच काय तर आशिया कप 2023 आणि 2025 स्पर्धेच्या जेतेपदावरही नाव कोरलं होतं. एशियन गेम्स 2023 स्पर्धेचं सुवर्णपदकही नावावर केलं आहे. भारतीय संघ वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र दुर्दैवाने भारताचा पराभव झाला आणि स्वप्न भंगलं. त्यांच्याच कार्यकाळात विराट कोहली आणि रोहित शर्माची टी20 आणि कसोटी कारकिर्द संपुष्टात आली.


            

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here