Home ब्रेकिंग न्यूज Dead Body in the Freezer : वडिलांचा मृतदेह फ्रीजमध्ये! 4 वर्षांचा गूढ रहस्य उघड; मुंबईत धक्कादायक प्रकार

Dead Body in the Freezer : वडिलांचा मृतदेह फ्रीजमध्ये! 4 वर्षांचा गूढ रहस्य उघड; मुंबईत धक्कादायक प्रकार

0
Dead Body in the Freezer : वडिलांचा मृतदेह फ्रीजमध्ये! 4 वर्षांचा गूढ रहस्य उघड; मुंबईत धक्कादायक प्रकार

मृतदेह 4 वर्षे फ्रीजरमध्ये ठेवला, विज्ञानाच्या मदतीने पुन्हा जिवंत होण्याची आशा

मुंबई : भविष्यात विज्ञानाच्या मदतीने मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येईल, या आशेने एका कुटुंबाने 78 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह तब्बल 4 वर्षे फ्रीजरमध्ये ठेवून दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील मालाड परिसरात समोर आला आहे. कुरार गावातील कोकणीपाडा परिसरातील एका डे-केअर सेंटरमध्ये हा मृतदेह ठेवण्यात आला होता. परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सेंटरची पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

https://www.prahaar.in/2026/09/30/major-operation-by-security-forces-in-budgam-lashkar-e-taiba-terrorist-killed/

भविष्यात त्यांना पुन्हा जिवंत करता येईल

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्तीचा 9 जून 2022 रोजी कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता. मृत व्यक्तीची मुलगी अमेरिकेत राहत असून तिचे वडिलांशी भावनिक नाते होते. अमेरिकेत क्रायोनिक्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मृतदेह अतिशय कमी तापमानात जतन केला जातो. भविष्यात विज्ञानाच्या प्रगतीमुळे अशा व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येईल, अशी या कुटुंबाची धारणा होती.

याच कारणामुळे मृतदेह जतन करण्यासाठी कुटुंबाने मालाडमधील संबंधित डे-केअर सेंटरची मदत घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेह ठेवण्यासाठी कुटुंबाकडून दरमहा सुमारे 1 लाख 60 हजार रुपये दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

इंटरनेटवर माहिती शोधली अन् अमेरिकेतील तंत्रज्ञानाची माहिती मिळाली

या संदर्भात पोलिसांनी मुलीची चौकशी केली. चौकशीत तीने सांगितले की, वडिलांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला होता. त्यांना पार्थिव शक्य तितका काळ जतन करून ठेवायचा होता. याकरिता त्यांनी इंटरनेटवर माहिती शोधली आणि त्यांना अमेरिकेतील क्रायोनिक्स तंत्रज्ञानाची माहिती मिळाली.

दरम्यान, या प्रकरणामुळे महापालिकेच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित डे-केअर सेंटरला बीएमसीने सुमारे 3 महिन्यांपूर्वी सील केले होते. मात्र, त्यावेळी सेंटरमध्ये फ्रीजरमध्ये मृतदेह ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास कसे आले नाही, असा सवाल आता उपस्थित केला आहे.

कुटुंबीयांनी पोलिसांकडे मृत्यू प्रमाणपत्र आणि बीएमसीकडे सादर केलेली कागदपत्रे दिली आहेत. या कागदपत्रांची सध्या पडताळणी सुरू आहे. मृतदेहाची स्थिती तपासण्यासाठी कूपर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेतली जात आहे.

दरम्यान, मृतदेह अशा पद्धतीने जतन करणे कायदेशीर आहे का, याचाही तपास कुरार पोलीस करत आहेत. वैद्यकीय तपासणी आणि कागदपत्रांच्या पडताळणीनंतर या प्रकरणात पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here