Home ब्रेकिंग न्यूज Sindhudurg Drought : सिंधुदुर्गात दुष्काळाची स्थिती गंभीर; शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार- मंत्री नितेश राणे

Sindhudurg Drought : सिंधुदुर्गात दुष्काळाची स्थिती गंभीर; शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार- मंत्री नितेश राणे

0
Sindhudurg Drought : सिंधुदुर्गात दुष्काळाची स्थिती गंभीर; शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार- मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग: दरवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 20 ते 25 टक्के पाऊस कमी पडल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अत्यल्प पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘ट्रिगर-1’ (Trigger-1) जाहीर करण्यात आला असून, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली.

https://www.prahaar.in/2026/09/27/lalpari-to-reach-tribal-hamlets-100-midi-buses-to-operate-in-remote-areas/

यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, ‘राज्यातील 265 तालुके ‘ट्रिगर-1’ अंतर्गत दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात आले असून, यामध्ये सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. आज सकाळपासून मी, जिल्हाधिकारी आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. डोळ्यांनी पाहिल्यानंतर प्रत्यक्ष परिस्थिती अधिक स्पष्ट होते. विहिरींमधील पाण्याची पातळी आणि भातशेतीचे झालेले नुकसान पाहिल्यावर सरकारकडे अधिक प्रभावीपणे बाजू मांडता येईल. आमच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणे हाच या पाहणी दौऱ्याचा मुख्य हेतू आहे.’

पहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)


ते पुढे म्हणाले, ‘गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विहिरींमध्ये निम्मेही पाणी उरलेले नाही आणि भाताची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. यावर काय कायमस्वरूपी तोडगा काढता येईल, यावर सरकार पातळीवर अभ्यास केला जाईल. कोकणात दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो; त्यामुळे छोटे बंधारे बांधून पाणी साठवल्यास भविष्यात अशी वेळ येणार नाही. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी 100 टक्के खंबीरपणे उभे असून, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना सरसकट आणि जास्तीत जास्त मदत कृतीतून मिळवून दिली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here