Home ब्रेकिंग न्यूज दुष्काळग्रस्त तालुक्यांना सरसकट मदत करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळं काही स्पष्ट सांगितलं

दुष्काळग्रस्त तालुक्यांना सरसकट मदत करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळं काही स्पष्ट सांगितलं

0
दुष्काळग्रस्त तालुक्यांना सरसकट मदत करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळं काही स्पष्ट सांगितलं
दुष्काळग्रस्त तालुक्यांना सरसकट मदत करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळं काही स्पष्ट सांगितलं (Photo: CMO Twitter)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. हाताशी आलेलं पिक करपून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र शेतकरी संकटात असल्याची जाणीव सरकारला आधीच होती. त्यामुळे कसलीही वाट न पाहता मुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि आमदारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी दौरा सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना योग्य ती मदत केली जाईल याबाबत आश्वासन दिलं आहे. याबाबत त्यांनी सरकारची स्पष्ट भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, ‘आपण 265 तालुके दुष्काळग्रस्त असल्याचं जाहीर केलं आहे. या तालुक्यात सरसकट मदत केली जाणार आहे. ज्या गोष्टी तातडीने करायच्या आहेत, त्याचीही घोषणा केलेली आहे. 12 उपाययोजनांची अमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे. ट्रिगर 1 बाबतचा आदेश काढला आहे. तसेच पुढील कारवाई केली जात आहे.’

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितलं की, ‘शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू आहेत. तसेच योग्य ती मदत सुरू केली आहे. याबाबतची प्रक्रिया आणखी वेगाने करत आहोत. शेतकऱ्यांना योग्य मदत देण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे. फार कमी तालुके आहेत, ज्यांची नावं यादीत नाही. त्या ठिकाणची देखील पाहणी केली जाईल. तेथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर 3 अंतर्गत समाविष्ट केलं जाईल. कोणताही शेतकरी सुटणार नाही, याची काळजी घेतली आहे. तसेच त्यांना येणाऱ्या अडचणीही दूर करणार आहोत.’

https://www.prahaar.in/2026/09/26/shiv-sena-to-extend-a-helping-hand-for-the-marriages-of-sons-and-daughters-from-drought-affected-farming-families/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एल निनोबाबत प्रतिक्रिया

एल निनोच्या संकटामुळे राज्यावर दुष्काळाची स्थिती ओढावली आहे. ही स्थिती कधी दूर होईल? असा प्रश्नही आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, ‘आता जे एल निनो आहे ते आणखी तीव्र होत जाणार आहे. फेब्रुवारीपर्यंत त्याची तीव्रता असेल. त्यानंतर त्याचा जोर ओसरेल. अशा पद्धतीचं पॅसिफिक ओशनचं हीटिंग असतं. फेब्रुवारीनंतर सौम्यता यायला सुरू होईल. त्यानंतर जोर कमी होईल. त्यामुळे आपल्याला सगळ्या प्रकारच्या तयारीत राहावे लागेल. एल निनोचा परिणाम वाढला. तर आपल्याला ज्या अडचणी येतील, त्यासाठी तयारीत राहावे लागेल.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here