Home ब्रेकिंग न्यूज Yami Gautam : यामी गौतमच्या ‘नयी नवेली’ चित्रपटातील ‘भाभी तबाही’ गाणे रिलीज, वहिनी आहे की डायन?

Yami Gautam : यामी गौतमच्या ‘नयी नवेली’ चित्रपटातील ‘भाभी तबाही’ गाणे रिलीज, वहिनी आहे की डायन?

0
Yami Gautam : यामी गौतमच्या ‘नयी नवेली’ चित्रपटातील ‘भाभी तबाही’ गाणे रिलीज, वहिनी आहे की डायन?
Yami Gautam

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम धर हिची मुख्य भूमिका असलेल्या ‘नयी नवेली’ या आगामी फँटसी फॅमिली एंटरटेनर चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यादरम्यान, चित्रपटातील ‘भाभी तबाही’ हे पहिले धमाकेदार गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले असून या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.(Yami Gautam)

https://www.prahaar.in/2026/09/26/sawan-barwals-historic-feat-secures-a-silver-medal-for-india-in-the-marathon-after-a-gap-of-44-years/

लग्नाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालेल्या या गाण्यात, कुटुंबात नव्याने आलेल्या ‘वहिनी’च्या (भाभीच्या) ‘मुह-दिखाई’ (मुखदर्शन) समारंभादरम्यान यामीच्या व्यक्तिरेखेची पहिली झलक पाहायला मिळते. या गाण्यात यामी अत्यंत उत्साहात आणि वेगळ्याच अंदाजात कुटुंबात प्रवेश करताना दिसत आहे.

काय आहे गाण्याची खासियत?

‘भाभी तबाही’ या गाण्याचे संगीत आणि निर्मिती जी.व्ही. प्रकाश कुमार यांनी केली आहे, तर याचे आकर्षक बोल वायू (Vayu) यांनी लिहिले आहेत. तसेच, नीती मोहन यांच्या जादूई आवाजाने या गाण्याला अधिकच रंगत आणली आहे. या गाण्यात भांगडा, रॅप, शास्त्रीय संगीत आणि हिप-हॉप यांचा एक सुरेख संगम पाहायला मिळतो. चित्रपटाच्या टीझरमध्ये नवीन वहिनी ही कदाचित ‘डायन’ (चेटकीण) असू शकते, अशी गूढता निर्माण केली गेली होती; मात्र हे गाणे चित्रपटाची मनोरंजक कथा एका हलक्या-फुलक्या आणि संगीतमय पद्धतीने पुढे घेऊन जाते. या गाण्याचे शानदार नृत्यदिग्दर्शन विजय गांगुली यांनी केले आहे.

https://www.prahaar.in/2026/09/26/alia-bhatts-retro-look-from-sanjay-leela-bhansalis-love-war-goes-viral-on-social-media/

चित्रपटाची स्टार कास्ट आणि रिलीज डेट

यामी गौतमसोबतच या चित्रपटात आदिनाथ एम. कोठारे, अनुराग ठाकूर, सुनीता राजवार, मीता वशिष्ठ, आदित्य कुलश्रेष्ठ, सुष्मिता मुखर्जी, सोनल झा आणि सुनील सिन्हा यांच्यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन बालाजी मोहन यांनी केले असून आनंद एल. राय आणि हिमांशू शर्मा या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची दिलचस्प कथा हिमांशू शर्मा आणि दिव्या निधी शर्मा यांनी लिहिली आहे.(Nayi Naveli Movie)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here