Home ब्रेकिंग न्यूज महाउत्सवाची सांगता! 22 तासांची भव्य मिरवणूक अन् अखेरचा निरोप; लालबागच्या राजाच्या विसर्जनाला नेमका उशीर का होत आहे?

महाउत्सवाची सांगता! 22 तासांची भव्य मिरवणूक अन् अखेरचा निरोप; लालबागच्या राजाच्या विसर्जनाला नेमका उशीर का होत आहे?

0
महाउत्सवाची सांगता! 22 तासांची भव्य मिरवणूक अन् अखेरचा निरोप; लालबागच्या राजाच्या विसर्जनाला नेमका उशीर का होत आहे?
Lalbaugcha Raja Visarjan 2026

मुंबई : लाडक्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी रविवारी गिरगाव चौपाटीवर जनसागर लोटला असून, नवसाला पावणार्‍या लाडक्या गणरायाची ऐतिहासिक मिरवणूक अद्यापही सुरू आहे. लालबागमधून निघालेल्या राजाची मिरवणूक चौपाटी परिसरात दाखल होण्यासाठी तब्बल 22 तासांचा प्रदीर्घ कालावधी लागला आहे. गेल्या 22 तासांपासून अविरत सुरू असलेल्या या मिरवणुकीनंतर आता संपूर्ण मुंबईचे लक्ष अंतिम विसर्जन सोहळ्याकडे लागले आहे.(Lalbaugcha Raja Visarjan 202)

यंदा गिरगाव चौपाटीवर पोहोचलेल्या लालबागच्या राजाच्या प्रत्यक्ष विसर्जनासाठी आणखी काही तासांचा विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजाची मूर्ती अत्यंत भव्य, मोठी आणि वजनाने जड असल्यामुळे सुरक्षेच्या सर्व बाजू तपासूनच पुढील प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पाडली जात आहे.

https://www.prahaar.in/2026/09/25/cm-devendra-fadnavis-family-eco-friendly-ganesh-visarjan-varsha-bungalow/

विसर्जनातील विलंबाची मुख्य कारणे

समुद्राची भरती: सकाळी 11 वाजेच्या सुमारास समुद्रात मोठी भरती येण्याची शक्यता असल्याने वाढलेली पाणीपातळी आणि प्रचंड लाटांमुळे मूर्ती सुरक्षितपणे पुढे नेणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन योग्य वेळेची प्रतीक्षा करत आहे.

तांत्रिक आव्हाने: भव्य मूर्तीच्या विसर्जनासाठी अत्याधुनिक यांत्रिक तराफ्याचा वापर केला जातो. लाटांच्या प्रभावामुळे तराफा असंतुलित झाल्यास प्रक्रियेचा वेग मंदावतो.

प्रचंड जनसागर: चौपाटीवर जमलेली लाखांची गर्दी आणि व्यवस्थापनावरील ताण यामुळेही वेळेत काहीसा बदल होत आहे.

गणेशोत्सवाच्या यापूर्वीच्या इतिहासातही अशाच काही तांत्रिक आणि नैसर्गिक परिस्थितीमुळे विसर्जनाला 12 ते 13 तास किंवा त्याहून अधिक उशीर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या पोलीस प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि मंडळाचे कार्यकर्ते संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. कोणतीही रिस्क न घेता अत्यंत शिस्तीत आणि सुरक्षितपणे हा ऐतिहासिक विसर्जन सोहळा पार पाडला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देताना भाविकांच्या डोळ्यात पाणी आले असले, तरी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषाने संपूर्ण गिरगाव चौपाटी दुमदुमून गेली आहे.(Lalbaugcha Raja Visarjan 202)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here