Home महाराष्ट्र नाशिक Nashik Ganesh Visarjan 2026 : पुढच्या वर्षी लवकर या ! नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Nashik Ganesh Visarjan 2026 : पुढच्या वर्षी लवकर या ! नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

0
Nashik Ganesh Visarjan 2026 : पुढच्या वर्षी लवकर या ! नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Nashik Ganesh Visarjan 2026 : साश्रूनयनांनी आज लाडक्या बाप्पााला निरोप देण्यात येत आहे. अनेक मंडळांची विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. यंदा बारा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी नाशिक शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीला पारंपरिक वाकडी बारव येथून सकाळी साडेअकराच्या सुमारास उत्साहात सुरुवात झाली. वाकडी बारव परिसरात सकाळपासूनच गणेशभक्तांची गर्दी झाली होती.पारंपरिक ढोल ताशांचा गजरात गणरायाचा जयघोष आणि उत्साहाच्या वातावरणात मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मानाच्या गणपतींच्या सहभागामुळे मिरवणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशाचा गजर

नाशिकच्या पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ वाकडी बारव येथून होण्याची परंपरा आहे. मिरवणुकीच्या प्रारंभी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतच महापौर हिमगौरी आडके यांनाही स्वतः ढोल वाजवून गणेशभक्तांचा उत्साह वाढविला. नाशिक शहरातील मानाच्या पहिल्या नाशिक मनपाच्या गणरायाची आरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली. यंदाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांवर मंडळांनी अधिक भर दिला आहे. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाची मंडळांकडून अंमलबजावणी होते किंवा नाही, याकडे अधिकाऱ्यांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. यंदाच्या मिरवणुकीत शहरातील चार मुख्य पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून निघणाऱ्या एकूण २५ गणेश मंडळांपैकी १५ मंडळे ही एकट्या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत.

https://www.prahaar.in/2026/09/25/nashik-ganesh-visarjan-2026-bhadrakali-dominates-nashiks-ganesh-visarjan-procession-official-order-of-25-mandals-announced/

ड्रोन, सीसीटीव्हीचे कवच

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष डिजिटल नियोजन केले आहे. मिरवणूक मार्गावरील सर्व प्रमुख चौक व सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फीड थेट पोलीस आयुक्तालय व स्मार्ट सिटीच्या मुख्य नियंत्रण कक्षाला जोडले आहे. हवेतून ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने संपूर्ण गर्दीवर नजर ठेवली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here