Home ब्रेकिंग न्यूज नाशिकमध्ये उमर खालिदवरील माहितीपटाच्या स्क्रीनिंगवरून वाद; भाजपकडून तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा

नाशिकमध्ये उमर खालिदवरील माहितीपटाच्या स्क्रीनिंगवरून वाद; भाजपकडून तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा

0
नाशिकमध्ये उमर खालिदवरील माहितीपटाच्या स्क्रीनिंगवरून वाद; भाजपकडून तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
Controversy in Nashik over screening of documentary on Umar Khalid

नाशिक : कुंभ नगरी नाशिकमध्ये देशविरोधी मानसिकता असल्याचा आरोप असलेल्या आणि देशद्रोहाच्या गुन्ह्यात असलेल्या उमर खालिदचे महिमामंडन करणारी माहितीपट (डॉक्युमेंटरी) काही संघटनांद्वारे प्रदर्शित केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावर भारतीय जनता पक्षाने (भाजप) तीव्र संताप व्यक्त केला असून, हे स्क्रीनिंग तातडीने थांबवण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अजित चव्हाण यांनी या प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. भारताच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचवणाऱ्या आणि देशद्रोहाचा आरोप असलेल्या व्यक्तीला ‘हिरो’ म्हणून पुढे आणणाऱ्या संघटनांचा त्यांनी धिक्कार केला आहे.

“देशविरोधी मानसिकता असलेल्या आणि देशद्रोहाचा आरोप असलेल्या उमर खालिदचे महिमामंडन करणारी डॉक्युमेंटरी कुंभ नगरी नाशिकमध्ये काही संघटनांद्वारे प्रदर्शित केली जाणार आहे. आम्ही नाशिक पोलिसांना हे स्क्रीनिंग थांबवण्याची विनंती केलेली आहे. असं झालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू. भारताच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचवणाऱ्या उमर खालिदला हिरो म्हणून पुढे आणणाऱ्या संघटनांचा देखील मी तीव्र शब्दांमध्ये धिक्कार करतो.”

— अजित चव्हाण, प्रवक्ता, भाजप, महाराष्ट्र

प्रशासनाने या प्रकरणी तातडीने दखल घेऊन स्क्रीनिंग रद्द करावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here