Home ब्रेकिंग न्यूज क्रेडिट कार्ड बिल भरताना तुम्ही 500 रुपये शिल्लक ठेवले तरी बसेल हजारोंचा फटका, कसं काय ते समजून घ्या

क्रेडिट कार्ड बिल भरताना तुम्ही 500 रुपये शिल्लक ठेवले तरी बसेल हजारोंचा फटका, कसं काय ते समजून घ्या

0
क्रेडिट कार्ड बिल भरताना तुम्ही 500 रुपये शिल्लक ठेवले तरी बसेल हजारोंचा फटका, कसं काय ते समजून घ्या
क्रेडिट कार्ड बिल भरताना तुम्ही 500 रुपये शिल्लक ठेवले तरी बसेल हजारोंचा फटका, कसं काय ते समजून घ्या (Photo: ANI)

भारतात क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. आता बँकांकडूनही काही गोष्टींची पूर्तता केल्यानंतर सहज क्रेडीट कार्ड दिलं जातं. पण क्रेडिट कार्ड वापरणं ही देखील एक कला आहे. त्याचा वापर योग्य प्रकारे केला तर ठीक अन्यथा वारेमाप खर्च करून कर्जाच्या विळख्यात अडकण्याची भीती असते. अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीप्रमाणे क्रेडीट कार्डचा वापर करणं गरजेचं आहे. अनेकदा क्रेडिट कार्ड बिलाची सायकल पूर्ण झाल्यानंतर बिलाची थोडी फार रक्कम भरताना चालढकलपणा करणं महागात पडू शकते. 500 रुपये नंतर भरू असा विचार केला तरी हजारोंचा फटका बसू शकतो. खरं तर नंतर ही रक्कम इतकी मोठी होते की ती त्या रकमेपेक्षाही अधिक असू शकते. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. एकूण देय रक्कम आणि किमान रक्कम या दोन्ही गोष्टी व्यवस्थित समजून घेणंही गरजेचं आहे.

समजा 500 रुपये शिल्लक राहिले तर…

उदाहरण द्यायचं झालं तर एका महिन्याचं तुमचं क्रेडीट कार्डचं बिल हे 10500 होतं. तुम्ही देय तारखेपूर्वी 10000 रुपये भरले आणि 500 रुपये शिल्लक ठेवले. तरी किमान रक्कम ही थकबाकी म्हणून गणली जाईल. त्यामुळे थकीत 500 रुपयांवर आकारल्या जाणाऱ्या व्याजापासून तुमची सुटका होणार नाही. त्यामुळे कार्ड जारी करणारी संस्था थकबाकीवर व्याज आकारू शकते. हा दर कार्डच्या अटी आणि शर्थीनुसार वेगळा असू शकतो. आकारल्या जाणाऱ्या शुल्काची आणि लागू होणाऱ्या व्याजदराची गणना याच आधारावर केली जाते. समजा, कार्डवर 42 टक्के वार्षिक व्याजदर आहे. म्हणजेच महिन्याला 3.5 टक्के व्याज लागू होतो. एका महिन्याला 500 रुपयांची थकबाजी ठेवली तर त्याला वर 17.50 रुपये व्याज लागेल. इतकंच काय तर कर आणि इतर शुल्कही लागू शकतात. 500 रुपयावर थेट मासिक शुल्क लागू होतो.

https://www.prahaar.in/2026/09/23/traffic-rules-for-ships-at-sea-who-fines-ships-violating-colregs-know-details/

इंटरेस्ट फ्री ग्रेस टाइमचा फायदा गमवण्याची वेळ

क्रेडीट कार्डवर जवळपास 20 ते 50 दिवसांचा इंटरेस्ट फ्री ग्रेस टाईम मिळतो. या कालावधीत बिलाची रक्कम भरली तर इंटरेस्ट लागू होत नाही. ही रक्कम ठरलेल्या कालावधीत भरावी लागते. जर तुम्ही बिलाची रक्कम ठरलेल्या वेळेत भरली नाही आणि तारीख उलटून गेल्यानंतरही खरेदी सुरू ठेवली, तर त्यावर व्याजमुक्त सुविधा मिळत नाही. तुमच्यावर 500 रुपयाची थकबाकी राहिल्यानंतर तुम्ही नवीन खरेदी केल्यास, प्रत्येक खरेदीवर व्याज आकारले जाते. पण यासाठी त्या संस्थेच्या नियम आणि अटी आहेत. 500 रुपयाची न भरलेली थकबाकी सुरुवातीला फार मोठी वाटत नसली तरी, प्रत्येक खरेदीसोबत ती वाढत जाते आणि पुढील बिलिंग सायकलमध्ये पुढे नेली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here