Home क्राईम Ketan Agarwal Murder Case : ‘तो’ चित्रपट, पॉडकास्ट अन् हनिमूनचा प्लॅन! लोहगडावर केतनला सियाने कसा संपवलं? हत्येची थरारक इनसाइड स्टोरी

Ketan Agarwal Murder Case : ‘तो’ चित्रपट, पॉडकास्ट अन् हनिमूनचा प्लॅन! लोहगडावर केतनला सियाने कसा संपवलं? हत्येची थरारक इनसाइड स्टोरी

0
Ketan Agarwal Murder Case : ‘तो’ चित्रपट, पॉडकास्ट अन् हनिमूनचा प्लॅन! लोहगडावर केतनला सियाने कसा संपवलं? हत्येची थरारक इनसाइड स्टोरी

पुणे : पुण्यातील व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल ( Ketan Agarwal) याच्या लोहगड किल्ल्यावर झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात न्यायालयात तब्बल 5 हजार 53 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. केतनचा मृत्यू अपघात नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी तपासात केला आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल, तिचा मित्र चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांचा सहभाग असल्याचे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, केतनला संपवण्याचा कट मार्च 2026 पासून सुरू होता. सुरुवातीला बाहेरील व्यक्तीच्या मदतीने केतनवर हल्ला करून त्याला कायमचे अपंग करण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र, हा प्रकार उघड झाल्यास अडचण निर्माण होण्याच्या भीतीने हा प्लॅन बदलण्यात आला. त्यानंतर केतनला किल्ल्यावरून खाली ढकलून अपघाती मृत्यूचा बनाव करण्याचा कट रचण्यात आला. ( Lohagad murder)

https://www.prahaar.in/2026/09/19/taunts-physical-abuse-and-a-demand-for-%e2%82%b95-lakh-tragic-end-for-26-year-old-sadiya-case-registered-against-husband-and-in-laws/

हत्येसाठी ChatGPT अन् क्राईम मुव्ही

या कटासाठी आरोपींनी गुन्हेगारी चित्रपट आणि पॉडकास्टचा आधार घेतल्याचे तपासात समोर आले आहे. हत्येची पद्धत समजून घेण्यासाठी ChatGPT चा वापर केल्याचाही उल्लेख दोषारोपपत्रात आहे. आरोपींनी लोहगडासह काही डोंगराळ भागांची पाहणी केली होती. लोहगडावरून एखादी व्यक्ती पडल्यास तो सेल्फी घेताना झालेला अपघात असल्याचे भासवता येईल, असा त्यांचा विचार होता. ( Chetan Chaudhary)

‘माही’ नावाने फेक इन्स्टाग्राम अकाऊंट

 या कटाचा भाग म्हणून आरोपींनी ‘माही’ नावाच्या एका काल्पनिक मुलीचे बनावट (Fake) इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले. १८ जून रोजी या फेक आयडीवरून केतनला मेसेज करण्यात आला. “मी सियाची मैत्रीण बोलतेय. आपण लोहगडावर जाऊन सियाचा वाढदिवस साजरा करूया आणि तिला एक छान सरप्राईज देऊ,” असे सांगून केतनचा विश्वास संपादन करण्यात आला आणि त्याला लोहगडावर येण्यास राजी केले.

लोहगड दरीत ढकलण्याचा कट

 ठरलेल्या योजनेनुसार, चेतन चौधरी हा आधीच किल्ल्याच्या एक्झिट रूटने वर गेला आणि तिथल्या एका मंदिरात लपून बसला. दुसरीकडे, सिया केतनला सोबत घेऊन फिरत-फिरत त्याच मंदिरापाशी पोहोचली. केतनचे लक्ष नसताना, आधीच ठरल्याप्रमाणे सियाने त्याला अचानक खांद्याने जोरात धक्का दिला, तर मंदिरातून बाहेर पडलेल्या चेतनने त्याच्या पायावर जोरदार लाथ मारली. या भीषण हल्ल्यामुळे केतनचा तोल गेला आणि तो शेकडो फूट खोल दरीत कोसळला. यात त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न अन् पोलिसांची कारवाई

 हत्या केल्यानंतर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून आरोपींनी तात्काळ ‘माही’ नावाचे ते फेक इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केले आणि सर्व डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोणावळा आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणापुढे (Technical Analysis) आरोपींचा हा बनाव टिकू शकला नाही. सायबर टीमने सर्व कड्या जोडत या हत्येचा पर्दाफाश केला आणि मुख्य आरोपी सिया गोयल, रितेश हांगे आणि चेतन चौधरी या तिघांनाही बेड्या ठोकून गजाआड केले

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here