Home ब्रेकिंग न्यूज Kalachowki Mahaganpati : मुंबईत गणेशोत्सवादरम्यान मोठी दुर्घटना! काळाचौकीच्या महागणपती मंडप परिसरात विजेचा धक्का; दोन जणांचा मृत्यू

Kalachowki Mahaganpati : मुंबईत गणेशोत्सवादरम्यान मोठी दुर्घटना! काळाचौकीच्या महागणपती मंडप परिसरात विजेचा धक्का; दोन जणांचा मृत्यू

0
Kalachowki Mahaganpati : मुंबईत गणेशोत्सवादरम्यान मोठी दुर्घटना! काळाचौकीच्या महागणपती मंडप परिसरात विजेचा धक्का; दोन जणांचा मृत्यू

काळाचौकीच्या महागणपती मंडप परिसरात मोठी दुर्घटना! शॉक लागून 2 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईत विविध ठिकाणी दुर्घटनांच्या घटना समोर येत आहेत. आता दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरात गणेश मंडपाजवळ विजेचा धक्का लागून दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत आणखी अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ( Mumbai Ganeshotsav 2026)

शनिवारी रात्री उशिरा काळाचौकीचा महागणपती मंडळाच्या परिसरात ही घटना घडली. गणेश दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक परिसरात उपस्थित होते. त्यावेळी अचानक काही भाविकांना विजेचा धक्का बसला. यामध्ये 2 मुले आणि 3 मुलींचा समावेश आहे. जखमींचे वय 8 ते 20 वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. ( electric shock)

https://www.prahaar.in/2026/09/20/that-movie-a-podcast-and-honeymoon-plans-how-did-siya-finish-off-ketan-at-lohagad-the-chilling-inside-story-of-the-murder/

 

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. जखमींना उपचारासाठी मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी परळ येथील ग्लोबल रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. आणि आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी 3 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. हे सर्वजण काळाचौकी परिसरात राहणारे असल्याचे सांगण्यात येत आहे.

काळाचौकी दुर्घटनेतील मृत आणि जखमींची नावे

  • रागिणी घनश्याम यादव (वय 8 वर्षे)- मृत्यू
  • सुजाता (वय 33)-  उपचारादरम्यान मृत्यू
  • किरण नाईक (वय 19 )- प्रकृती स्थिर
  • तन्वी हांडे  (वय 19)- प्रकृती स्थिर
  • साहिल तरे (वय 19)- प्रकृती स्थिर
  • रुही सिंग (वय 12)- गंभीर प्रकृती

दरम्यान, या मुलांना नेमका विजेचा धक्का कशामुळे लागला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मंडप परिसरातील विद्युत जोडणी आणि इतर सुरक्षेच्या उपाययोजनांचीही तपासणी केली जात आहे. या दुर्घटनेमुळे गणेशोत्सवाच्या काळात लालबाग-परळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ( Ganesh pandal)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here