मुंबई : रायफल हातात घेतली, लक्ष्यावर नजर रोखली आणि अचूक निशाणा साधत भारतीय नेमबाज एलावेनिल वलारिवनने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीची छाप सोडली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये एलावेनिलने महिलांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत शानदार कामगिरी करत रौप्यपदकावर नाव कोरलं. (Elavenil Valarivan Silver Medal)
अंतिम फेरीत एलावेनिलने २५२.४ गुणांची कमाई करत दुसरं स्थान मिळवलं. तिच्या या दमदार कामगिरीमुळे भारताच्या पदकतालिकेत आणखी एका पदकाची भर पडली. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचं हे दुसरं पदक ठरलं आहे.
भारताची स्टार नेमबाज एलावेनिल वलारिवनने महिला एकेरी गटात रौप्यपदक पटकावले. भारतीय संघाला शुटिंगमध्ये अजून एक पदक…
महिलांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत, एलावेनिलनं २५२.४ गुणांसह दुसरं स्थान पटकावलं आणि रौप्यपदक जिंकलं. आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेतील भारताचं हे दुसरं… pic.twitter.com/30mV65XqAU
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 20, 2026
https://www.prahaar.in/2026/09/20/one-four-and-a-historic-record-smriti-mandhana-becomes-the-highest-run-scorer-in-womens-t20i-cricket/
रायफल हातात अन् अचूक निशाणा!
अंतिम फेरीत एलावेनिलने सुरुवातीपासूनच संयम आणि अचूकतेचा उत्तम मेळ साधला. प्रत्येक शॉटमध्ये सातत्य राखत तिने प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हान उभं केलं. अखेर २५२.४ गुणांसह दुसरं स्थान मिळवत तिने रौप्यपदक पटकावलं. (Elavenil Valarivan Silver Medal)
तिच्या या कामगिरीमुळे भारतीय नेमबाजीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
https://www.prahaar.in/2026/09/19/the-impasse-regarding-the-asia-cup-trophies-which-mohsin-naqvi-had-refused-to-accept-is-set-to-be-resolved-the-bcci-secretary-stated-both-trophies-will-come-to-mumbai/
स्पर्धेत एलावेनिलचं दुसरं पदक
विशेष म्हणजे, आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये एलावेनिल वलारिवनने मिळवलेलं हे दुसरं पदक आहे. त्यामुळे तिच्यासाठीही ही स्पर्धा विशेष ठरली आहे.
एलावेनिलच्या या कामगिरीनंतर भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण असून, सोशल मीडियावरही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चमकणाऱ्या या भारतीय नेमबाजीकडून भविष्यातील स्पर्धांमध्येही दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Elavenil Valarivan Silver Medal)
अचूक निशाणा साधत देशासाठी रौप्यपदक जिंकणाऱ्या एलावेनिल वलारिवनचं मनःपूर्वक अभिनंदन! तिच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा.