Home ब्रेकिंग न्यूज Madhuri Dixit : पैठणी, नथ अन् ‘धकधक गर्ल’चा मराठमोळा अंदाज; ‘कोण होणार करोडपती?’ची तारीख अखेर ठरली!

Madhuri Dixit : पैठणी, नथ अन् ‘धकधक गर्ल’चा मराठमोळा अंदाज; ‘कोण होणार करोडपती?’ची तारीख अखेर ठरली!

0
Madhuri Dixit : पैठणी, नथ अन् ‘धकधक गर्ल’चा मराठमोळा अंदाज; ‘कोण होणार करोडपती?’ची तारीख अखेर ठरली!

मुंबई : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आता छोट्या पडद्यावर एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय ज्ञानाधारित कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’च्या आगामी पर्वाची सूत्रसंचालनाची जबाबदारी यंदा माधुरी दीक्षित सांभाळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना या पर्वाची उत्सुकता होती. अखेर कार्यक्रमाच्या प्रीमियरची तारीख समोर आली आहे. (Madhuri Dixit)

‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, १२ ऑक्टोबरपासून सोनी मराठीवर हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे आता माधुरीसोबत हॉटसीटवर बसून ज्ञानाची परीक्षा देणाऱ्या स्पर्धकांचीही उत्सुकता वाढली आहे.

https://www.prahaar.in/2026/09/20/salman-khan-furious-over-trolling-of-katrina-takes-off-shirt-on-bigg-boss-20/

यंदाचं पर्व अनेक कारणांनी विशेष ठरणार आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर, महेश मांजरेकर आणि नागराज मंजुळे यांसारख्या लोकप्रिय कलाकारांनी केलं आहे. आता पहिल्यांदाच एका दिग्गज महिला अभिनेत्रीच्या रूपात माधुरी दीक्षित या ज्ञानाच्या मंचाची सूत्रं हातात घेताना दिसणार आहे. (Madhuri Dixit)

मराठमोळ्या अंदाजात माधुरीची एंट्री

या पर्वाचा पहिला प्रोमो १० ऑगस्ट २०२६ रोजी प्रेक्षकांसमोर आला होता. या प्रोमोमध्ये माधुरी दीक्षित हिरव्या रंगाच्या पैठणीमध्ये, नथ, चंद्रकोर आणि पारंपरिक दागिन्यांनी सजलेल्या मराठमोळ्या रूपात दिसली होती. आपल्या खास अंदाजात कार्यक्रमाची घोषणा करत तिने नव्या पर्वाची उत्सुकता निर्माण केली होती.

त्यानंतर चाहत्यांमध्ये एकच प्रश्न होता ‘कोण होणार करोडपती’चा नवा सीझन नेमका कधी सुरू होणार? आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. (Madhuri Dixit)

https://www.prahaar.in/2026/09/19/deepika-padukone-ranveer-singh-blessed-with-second-baby-girl/

१५ ऑगस्टपासून सुरू झाली होती नोंदणी

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी १५ ऑगस्ट २०२६पासून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यावेळी माधुरीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत स्पर्धकांना पुढील प्रक्रियेत सहभागी होता येत होतं. (Madhuri Dixit)

आता २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमधून कार्यक्रमाच्या प्रसारणाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. विज्ञान, इतिहास, भूगोल यांसह विविध विषयांवरील प्रश्नांच्या माध्यमातून स्पर्धकांच्या ज्ञानाची कसोटी या पर्वात पाहायला मिळणार आहे.

माधुरीच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा पारंपरिक अंदाजासोबतच तिची संवाद साधण्याची खास शैली या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे १२ ऑक्टोबरपासून ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर ज्ञान, मनोरंजन आणि माधुरीचा खास अंदाज प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. (Madhuri Dixit)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here