Home ब्रेकिंग न्यूज Jogeshwari Ganeshotsav tragedy : मुंबईत गणेश विसर्जनाला गालबोट; जोगेश्वरीत विजेचा धक्का लागून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Jogeshwari Ganeshotsav tragedy : मुंबईत गणेश विसर्जनाला गालबोट; जोगेश्वरीत विजेचा धक्का लागून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

0
Jogeshwari Ganeshotsav tragedy : मुंबईत गणेश विसर्जनाला गालबोट; जोगेश्वरीत विजेचा धक्का लागून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंबई : गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी विजेच्या धक्क्याच्या घटना घडल्या आहेत. जोगेश्वरी पूर्व येथील श्याम नगर तलावाजवळील कृत्रिम विसर्जन तलावात गौरी-गणपती विसर्जन करताना विजेचा धक्का लागून 19 वर्षीय रोहित भीमसिंग राठोड याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून महापालिका प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ( Jogeshwari Ganeshotsav)

https://www.prahaar.in/2026/09/20/electric-shock-in-the-kalachowki-mahaganpati-pandal-area-8-year-old-girl-dies-5-injured/

विसर्जनावेळी नेमकं काय घडलं ?

गुरुवारी संध्याकाळी ट्रॉमा केअर हॉस्पिटलजवळील कृत्रिम तलावात विसर्जन सुरू होते. यावेळी रोहित पाण्यात उतरला होता. त्याचवेळी पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला जोरदार धक्का बसला. उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने जवळच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. ( Jogeshwari Ganeshotsav tragedy)

रोहित हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याची माहिती आहे. त्याच्या आईचे आधीच निधन झाले होते. त्यामुळे मुलाच्या अचानक मृत्यूने त्याच्या वडिलांवर मोठे दुःख कोसळले आहे. घटनेनंतर रोहितच्या नातेवाईकांनी महापालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

पोलिसांकडून तपास सुरु

या प्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कृत्रिम तलावात वीज कशी उतरली आणि यामागे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

काळाचौकी महागणपती मंडप परिसरात दुर्घटना

दरम्यान, काळाचौकी परिसरातही गणेशोत्सवाच्या ठिकाणी विजेच्या धक्क्याची गंभीर घटना घडली. दत्ताराम लाड मार्गावरील महागणपती उत्सव मंडळाजवळील तात्पुरत्या कोल्ड्रिंक स्टॉलमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याची माहिती आहे. या घटनेत 8 वर्षीय रागिणी घनश्याम यादव आणि 33 वर्षीय सुजाता यांचा मृत्यू झाला असून अन्य 4 जण जखमी झाले आहेत. यापैकी 12 वर्षीय रुही सिंह हिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत.घटनेनंतर BEST अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून तात्पुरत्या मीटरची वायरिंग आणि MCB डिस्कनेक्ट केली. या घटनेचाही पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here