Home ब्रेकिंग न्यूज Sanjay Lathkar : मराठमोळे अधिकारी संजय लाठकर यांची अणुऊर्जा विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती

Sanjay Lathkar : मराठमोळे अधिकारी संजय लाठकर यांची अणुऊर्जा विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती

0
Sanjay Lathkar : मराठमोळे अधिकारी संजय लाठकर यांची अणुऊर्जा विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : मराठवाड्यातील संजय आनंदराव लाठकर यांच्यावर देशाच्या अणुऊर्जा क्षेत्राशी संबंधित सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लातूरचे माजी पोलीस अधीक्षक आणि नांदेडचे रहिवासी असलेल्या लाठकर यांची केंद्र सरकारच्या अखत्यारीतील अणुऊर्जा विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देशातील अणुऊर्जा केंद्रे, संबंधित संस्था तसेच किरणोत्सारी पदार्थांच्या साठ्यांच्या सुरक्षेचे व्यवस्थापन त्यांच्या अखत्यारीत राहणार आहे.

लाठकर यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील ५०हून अधिक अणुऊर्जा केंद्रे आणि संबंधित संस्थांच्या सुरक्षेशी निगडित व्यवस्था तसेच युरेनियमसारख्या किरणोत्सारी पदार्थांच्या साठ्यांच्या सुरक्षेशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडल्या जाणार आहेत. मराठवाड्यातील अधिकाऱ्याला प्रथमच या पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे.

https://www.prahaar.in/2026/09/17/shadow-of-water-scarcity-looms-over-the-state-state-government-directs-preparation-of-a-plan-for-scarcity-hit-villages/

संजय लाठकर हे १९९५च्या तुकडीचे झारखंड केडरचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मराठवाड्यात त्यांनी लातूर आणि परभणीचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. त्यानंतर पुण्यात अप्पर पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकात पोलिस उपमहानिरीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

गडचिरोली, मुंबई तसेच झारखंडमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या उपमहानिरीक्षकपदाची जबाबदारीही लाठकर यांनी सांभाळली आहे. कर्नाटक, हैदराबाद, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या प्रमुखपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.

लाठकर यांच्या सेवाकाळातील कामगिरीची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली आहे. त्यांना राष्ट्रपतींची तीन आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची तीन पदके मिळाली आहेत. महाराष्ट्र, बिहार आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांकडूनही त्यांना एकूण ११ पदके मिळाली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या तंटामुक्त गाव मोहिमेसह अल्पसंख्याक विभागाशी संबंधित कामासाठी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले आहेत. सेवाकाळात त्यांना एकूण ११ पदके आणि तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here