Home क्रीडा Prithvi Shaw-Aakriti Agrawal : लग्नाआधीच तुटलं नातं ! आकृती अग्रवालची भावनिक पोस्ट, म्हणाली अत्यंत….

Prithvi Shaw-Aakriti Agrawal : लग्नाआधीच तुटलं नातं ! आकृती अग्रवालची भावनिक पोस्ट, म्हणाली अत्यंत….

0
Prithvi Shaw-Aakriti Agrawal : लग्नाआधीच तुटलं नातं ! आकृती अग्रवालची भावनिक पोस्ट, म्हणाली अत्यंत….

Prithvi Shaw-Aakriti Agrawal : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांच्या नात्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत आकृती अग्रवालने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत पृथ्वी शॉसोबतचं नातं संपल्याची घोषणा केली आहे.

आकृतीने पोस्ट करत दिली माहिती

आकृतीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ती आणि तिचा होणारा पती आता वेगळे झाले आहेत. दोघांची भविष्यातील उद्दिष्टं वेगळी असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचं तिने स्पष्ट केलं. तिने लिहिलं की, “अत्यंत जड अंतःकरणाने मला हे सांगायचं आहे की, मी आणि माझ्या होणाऱ्या पतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्याबाबतची आमची उद्दिष्टं वेगळी असल्याने आम्ही आता एकत्र नाही.” परिस्थिती आणि सध्याच्या जबाबदाऱ्यांचा विचार करून दोघांनी हा निर्णय घेतल्याचंही आकृतीने सांगितलं. एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर कायम असला तरी आपण एकमेकांसाठी योग्य नाही, असं दोघांना वाटत असल्याचं तिने पोस्टमध्ये नमूद केलं.

https://www.prahaar.in/2026/09/17/novak-djokovic-set-to-return-to-the-china-open-after-11-years-will-compete-in-the-tournament-in-beijing/

‘आमच्या प्रायव्हसीचा आदर करा’

नातं संपल्याची माहिती देतानाच आकृतीने सोशल मीडिया युजर्सना त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती केली आहे. दोघांच्या शांततेसाठी आणि आनंदासाठी आपण प्रार्थना करत असल्याचं तिने म्हटलं. तसेच, “आमचे मार्ग आता वेगळे झाले असून आम्ही पुढे जात आहोत,” असंही तिने स्पष्ट केलं. या कठीण काळात त्यांच्या निर्णयाबाबत तर्क-वितर्क करू नका किंवा खोट्या कथा पसरवू नका, अशी विनंतीही आकृतीने केली आहे.

साखरपुड्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत नातं संपलं

पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांनी 8 मार्च 2026 रोजी मोठ्या थाटामाटात साखरपुडा केला होता. साखरपुड्यानंतर दोघांनी परदेशात ट्रीपही केली होती. त्यावेळी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ही जोडी आनंदी दिसत होती. मात्र, त्यानंतर पृथ्वी शॉ आकृतीची फसवणूक करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या. आकृतीने यापूर्वी या अफवा फेटाळून लावल्या होत्या. यादरम्यान तिने काही क्रिप्टिक पोस्टही शेअर केल्या होत्या. मात्र, त्या पोस्टचा आपल्या नात्याशी संबंध नसल्याचं तिने स्पष्ट केलं होतं. दरम्यान, पृथ्वी शॉने या चर्चांवर किंवा आरोपांवर सार्वजनिकरित्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता आकृतीनेच नातं संपल्याची घोषणा केल्याने या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here