Shehnaaz Gill Viral Video : काही दिवसांपूर्वीच ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री जुई गडकरीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विमान दुर्घटनेतून थोडक्यात बचावल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता अभिनेत्री शहनाज गिलचा विमानातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शहनाज प्रचंड घाबरलेली दिसत असून, ती हात जोडून देवाचं नाव घेताना दिसते. (Shehnaaz Gill Viral Video)
व्हिडीओमध्ये शहनाज विमानाच्या सीटवर बसलेली दिसत आहे. तिने हात जोडले असून, ती सतत ‘वाहेगुरू, वाहेगुरू’ असा जप करत आहे. तिच्या चेहऱ्यावरची भीतीही स्पष्टपणे जाणवते. शहनाजचा भाऊ शहबाज याने हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Shehnaaz Gill Viral Video)
हा व्हिडीओ शहनाजच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेअर करण्यात आला आहे. त्यावर तिने ‘थोडक्यात बचावलो’ अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे.
View this post on Instagram
व्हिडीओच्या शेवटी विमान लँड होताना दिसतं. विमान जमिनीवर उतरताच शहनाजच्या चेहऱ्यावरील भीती काहीशी कमी होते आणि ती मोठ्याने ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करते. मोठ्या संकटातून सुटल्यासारखा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून येतो. (Shehnaaz Gill Viral Video)
https://www.prahaar.in/2026/09/16/a-mistake-occurred-while-salman-khan-was-performing-the-aarti-during-the-ganpati-immersion-his-sister-arpita-stopped-him-midway-and-then/
मग विमानात नेमकं घडलं तरी काय?
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, व्हिडीओ बारकाईने पाहिल्यास शहनाजचा भाऊ शहबाज हसताना दिसतो. तिच्या शेजारी बसलेले इतर प्रवासीही अगदी सामान्यपणे दिसत आहेत. त्यामुळे विमानात काही गंभीर किंवा धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याचं व्हिडीओमधून दिसत नाही. (Shehnaaz Gill Viral Video)
खरंतर ही भीती शहनाजच्या विमान प्रवासाच्या भीतीशी संबंधित असल्याचं दिसत आहे. तिला विमानाने प्रवास करण्याची भीती वाटते आणि तिच्या भावाने तिची ही प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद करून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यामुळे व्हिडीओ पाहून शहनाजचे चाहतेही चकित झाले आहेत.
https://www.prahaar.in/2026/09/16/salman-khan-cryptic-post-salmans-post-worries-fans-in-the-post-he-says-i-was-happy-when-i-had-fewer-things-now/
‘बिग बॉस’मुळे मिळाली लोकप्रियता
शहनाज गिल ‘बिग बॉस’मुळे घराघरात पोहोचली. शोमध्ये सिद्धार्थ शुक्लासोबतच्या तिच्या जोडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर शहनाजने मनोरंजनविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
ती अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका म्हणून काम करते. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातही ती दिसली होती. याशिवाय ‘थँक यू फॉर कमिंग’ यांसारख्या चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारली आहे. तिचा पंजाबी चित्रपट ‘कौर सिंग व्हर्सेस कौर 2’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. (Shehnaaz Gill Viral Video)