Bigg Boss 20 : प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. बादशाह आणि त्याची पूर्व पत्नी ईशा रिखी यांचं नातं काही काळातच संपुष्टात आलं. मात्र 5 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या बादशाह आणि त्याची पूर्व पत्नी ईशा रिखी यांच्या नात्यात असं काय बिनसलं की त्यांचा अवघ्या ५ महिन्यांतच संसार तुटला. काही दिवसांपूर्वीच दोघांनीही आपण वेगळे होत असल्याची अधिकृत घोषणा देखील केली. मात्र दोघांमध्ये बिनसलं काय ? याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
दरम्यान सध्या ईशा रिखी ‘बिग बॉस 20’ मध्ये स्पर्धक म्हणून आली आहे. आणि याठिकाणी ईशाने तिच्या घटस्फोटामागचं कारण स्पष्ट केलंय. ती खरंतर कनिकाला उदाहरण देऊन काही समजावत होती, मात्र यावेळेस ती बादशाह आणि तिच्यामधील नात्यात दुरावा का निर्माण झाला यावरही बोलली. यावेळी नातं मोडण्यामागचं कारण बादशाह असल्याचं तिने सांगितलं.
https://www.prahaar.in/2026/09/16/salman-khan-cryptic-post-salmans-post-worries-fans-in-the-post-he-says-i-was-happy-when-i-had-fewer-things-now/
ईशा बादशाहबद्दल काय म्हणाली ?
बिग बॉस 20 च्या नुकत्याच आलेल्या एपिसोडमध्ये ईशा आणि कनिका लग्नाबद्दल बोलत होत्या. यावेळेस ईशा म्हणाली – ‘ कोणी जर मला येऊन सांगितलं की ईशा अशी आहे, तशी आहे. तर मी ती गोष्ट जोपर्यंत स्वत:च्या डोळ्यांनी पहात नाही, तोपर्यंत मी त्यावर विश्वास ठेवणार नाही. मी अशीच आहे. नात्यांच्या बाबतीही माझं असं वागण आहे. कोणी जर मला काहीही सांगितलं तर मी त्यांना सांगेन, एकतर मला पुरावा द्यास नाहीतर माझ्या मनाशी खेळण बंद करा.’ असं ईशा म्हणाली. एखाद्या नात्याबद्दल संशय येऊ शकतो, पण मी जोपर्यंत स्वत: ते पहात नाही, मी त्यावर विश्वास ठेवत नाही, असं तिने नमूद केलं. जेव्हा एखादं नातं संपत, तेव्हा तुम्हाला कळतं की संपूर्ण काळ तुमचा विश्वासघात झाला. त्यावर कनिकाने तिला प्रश्न विचारला की, तुला शारीरिक, मानसिक की सोशल, कोणता विश्वासघात सहन करावा लागला ? त्यावर थोडं थांबून नंतर ईशाने उत्तर दिलं की – सगळ्या प्रकारचा.
https://www.prahaar.in/2026/09/16/why-was-shehnaaz-gill-so-scared-on-the-plane-she-chanted-waheguru-with-folded-hands-and-said-ganpati-bappa-morya-after-landing/
बादशाहसोबतचं नातं टॉक्सिक ?
पुढे ईशा म्हणाली की ‘ मध्ये अडकून पडणं खूप टॉक्सिक असतं. म्हणजे मी तुला खात्री देईन की तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, मी तुझ्या बेस्ट फ्रेंडप्रमाणेच वागेन, सगळीकडे घेऊन जाईन. पण नंतर एक वेळ अशी येईल तेव्हा तुला समजेल की खरंतर तू कधीच माझी बेस्ट फ्रेंज नव्हतीस. त्याचप्रमाणे, एखाद्याची त्याच्या पार्टनरच्या संपूर्ण मित्रपरिवाराशी ओळख करून दिली जात नाही; फक्त काही निवडक आणि खास लोकांशीच त्यांची ओळख करून दिली जाते.’ असं तिने सांगितलं