Home ब्रेकिंग न्यूज Jalgaon Accident News : शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटल्याने अपघात, दोन हमालांचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident News : शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटल्याने अपघात, दोन हमालांचा जागीच मृत्यू

0
Jalgaon Accident News : शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटल्याने अपघात, दोन हमालांचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी ते पहूर मार्गावर शालेय पोषण आहाराची वाहतूक करणारा टेम्पो अचानक टायर फुटल्याने उलटल्याने दुर्दैवी अपघात घडला. या दुर्दैवी घटनेत टेम्पोमध्ये पोषण आहाराच्या गोण्यांवर बसलेले दोन हमाल वाहनाबाहेर फेकले गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी हा अपघात घडलाय. जगदीश लालचंद पाटील (रा. कृष्णापुरी, पाचोरा) आणि अर्जुन तुकाराम पाटील (रा. बहिरम नगर, पाचोरा) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

https://www.prahaar.in/2026/09/16/nashik-crime-news-rampage-over-unpaid-ganpati-contribution-vandalism-with-choppers-and-knives-stone-pelting-and-looting/

नेमकं काय घडलं ?

प्राथमिक माहितीनुसार, शेंदुर्णी ते पहूर रस्त्यावरुन (Shendurni to Pahur road) धावणाऱ्या ४०७ टेम्पोमध्ये पाचोरा येथून शालेय पोषण आहाराच्या गोण्या भरण्यात आल्या होत्या. हा माल पुढील वितरणासाठी नेला जात होता. वाहतुकीदरम्यान दोन हमाल टेम्पोमधील पोषण आहाराच्या गोण्यांवर बसले होते. टेम्पो रस्त्याने धावत असताना अचानक टायर फुटला अन् त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो रस्त्यावर उलटला. या अपघाताची तीव्रता एवढी होती की, गोण्यांवर बसलेले दोन्ही हमाल थेट वाहनाबाहेर फेकले गेले. त्यांना गंभीर दुखापत झाली आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. (Jalgaon Accident)

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पहूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताची कारणे आणि परिस्थितीची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. अपघात केवळ टायर फुटल्यामुळे झाला, असे मानून प्रकरण संपवण्याऐवजी वाहतुकीतील सुरक्षेच्या सर्व बाबींची चौकशी करण्याची मागणी होत आहे. वाहनाची तांत्रिक स्थिती, टायरची अवस्था, चालकाचे नियंत्रण का सुटले, तसेच वाहनात कामगारांना कोणत्या परिस्थितीत बसवण्यात आले होते, यासह विविध बाबींचा तपास आता केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here