Home ब्रेकिंग न्यूज Modak Mahotsav 2026 : एफडीएच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचा मोदक महोत्सव

Modak Mahotsav 2026 : एफडीएच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचा मोदक महोत्सव

0
Modak Mahotsav 2026 : एफडीएच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचा मोदक महोत्सव

महिला बचत गटांना अन्न सुरक्षा प्रशिक्षण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागांतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या मार्गदर्शनाखाली यंदाही गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘मोदक महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या मोदक महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महिला बचत गटांना अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या सहकार्याने अन्नसुरक्षेबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले. मुंबई महानगरपालिका आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मोदक निर्मिती करताना घ्यावयाची स्वच्छता, अन्नसुरक्षा, अन्न हाताळणी, कच्च्या मालाची गुणवत्ता आणि पॅकिंग याबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. (Modak Mahotsav 2026)

https://www.prahaar.in/2026/09/15/amruta-fadnavis-visits-the-mayors-residence-for-darshan-of-lord-ganesha-welcomed-by-the-tawde-family/

या प्रशिक्षणानुसार महिला बचत गटांनी अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करून मोदक निर्मितीस सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईकरांना घरगुती चवीचे, स्वादिष्ट तसेच स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या निकषांचे पालन करून तयार केलेले गुणवत्तापूर्ण मोदक उपलब्ध होणार आहेत. या उपक्रमातून महिला बचत गटांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळण्यासोबतच मुंबईकरांना सुरक्षित आणि दर्जेदार मोदक उपलब्ध करून देण्याचा दुहेरी उद्देश साध्य होणार आहे. (Modak Mahotsav 2026)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here