मुंबई : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी १५ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईच्या भायखळा येथील महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट देत श्रीगणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. (Amruta Fadnavis)
महापौर रितू राजेश तावडे यांच्या निवासस्थानी आगमन झाल्यानंतर तावडे कुटुंबीयांच्या वतीने अमृता फडणवीस यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी बाप्पाची आरती करून सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. (Amruta Fadnavis)
https://www.prahaar.in/2026/09/15/new-avenues-for-employment-in-market-committees-governments-resolve-to-turn-farmers-children-into-entrepreneurs/
महापौर निवासस्थानी विराजमान असलेल्या शाडू मातीच्या सुबक गणेशमूर्तीचे आणि पर्यावरणपूरक सजावटीचे अमृता फडणवीस यांनी कौतुक केले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीदरम्यान तावडे कुटुंबीयांशी त्यांनी संवादही साधला. (Amruta Fadnavis)
यावेळी महापौर रितू तावडे, त्यांचे पती राजेश तावडे, सुपुत्र यश, कन्या मधुरा तसेच कुटुंबीय आणि भाविक उपस्थित होते.