मुंबई : नीम करौली बाबांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनपेक्षित यश मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अवघ्या २ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल २८० कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शनाच्या सुरुवातीला केवळ तीन चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला नंतर मिळालेल्या माउथ पब्लिसिटीमुळे मोठा प्रतिसाद मिळाला. (Hanuman Ansh)
यापूर्वी नीम करौली बाबांच्या जीवनावर आधारित ‘श्री बाबा नीब करौरी महाराज’ हा बायोपिक २९ मे २०२६ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे यांनी नीम करौली बाबांची भूमिका साकारली होती. मात्र, चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. चित्रपटाने सुमारे ७२ लाख रुपयांची लाइफटाइम कमाई केली. पहिल्याच दिवशी चित्रपटाच्या कमाईचा आकडा केवळ ७ लाख रुपये होता.
https://www.prahaar.in/2026/09/15/even-king-khan-has-become-a-fan-of-dhurandhar-he-said-i-about-this-film/
फ्लॉप बायोपिकमुळे ‘हनुमान अंश’ची रिलीज पुढे ढकलली
‘श्री बाबा नीब करौरी महाराज’च्या अपयशानंतर ‘हनुमान अंश’च्या निर्मात्यांनीही चित्रपटाच्या कामगिरीबाबत चिंता व्यक्त केली. त्यामुळे सुरुवातीला १९ जून रोजी होणारे प्रदर्शन जवळपास दोन महिने पुढे ढकलून ७ ऑगस्ट करण्यात आले.
निर्मात्यांनी यावर्षी १५ जून रोजी झालेल्या कैंची धामच्या स्थापना दिनाचा विचार करून १९ जून ही रिलीज डेट निश्चित केली होती. मात्र, सुबोध भावेच्या बायोपिकला मिळालेल्या अल्प प्रतिसादानंतर त्यांनी निर्णय बदलला. (Hanuman Ansh)
फक्त ३ थिएटरपासून सुरुवात, नंतर कमाईचा धडाका
७ ऑगस्टला ‘हनुमान अंश’ केवळ तीन चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. सुरुवातीला चित्रपटासमोर अनेक अडचणी होत्या. मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळू लागल्या. सोशल मीडियावर चित्रपटातील क्लिप व्हायरल झाल्या आणि माउथ पब्लिसिटीमुळे हळूहळू चित्रपटाच्या स्क्रीन आणि प्रेक्षकसंख्येत वाढ झाली. (Hanuman Ansh)
अवघ्या २ कोटींच्या निर्मिती खर्चात तयार झालेल्या या सिनेमाने सुमारे २८० कोटींची कमाई करत मोठा विक्रम केला. २०० कोटींपेक्षा अधिक कमाई करेल, अशी अपेक्षाही निर्मात्यांनी केली नव्हती.
https://www.prahaar.in/2026/09/15/the-menacing-villain-of-devmanus-steps-into-the-role-of-director-poster-launched-for-kiran-gaikwads-f-i-r-no-469/
शेवटच्या क्षणी बदलला मुख्य अभिनेता
‘हनुमान अंश’च्या निर्मितीदरम्यानही एक रंजक घटना घडली. चित्रपटासाठी सुरुवातीला दुसऱ्या अभिनेत्याची निवड करण्यात आली होती. मात्र, शूटिंगच्या शेवटच्या टप्प्यात त्या अभिनेत्याची तब्येत बिघडल्याने चित्रपटाचे शूटिंग थांबण्याची शक्यता निर्माण झाली. (Hanuman Ansh)
याच वेळी शोभिनव सत्याची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली. त्यांचे तब्बल ४ ते ५ तास ऑडिशन घेण्यात आले. सुरुवातीला दबाव आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेचा सामना करावा लागला असला तरी निर्मात्यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. अखेर त्यांनी नीम करौली बाबांची भूमिका साकारली आणि चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे त्यांच्या निवडीची मोठी चर्चा झाली. (Hanuman Ansh)
https://www.prahaar.in/2026/09/15/bigg-boss-20bigg-boss-20-three-contestants-nominated-in-the-second-week-who-is-facing-the-looming-threat-of-elimination/
‘हनुमान अंश’ ठरला अनपेक्षित ब्लॉकबस्टर
निर्माते विशाल चतुर्वेदी आणि अनुप्रिया नागर यांचा चित्रपटावर आणि त्यांच्या श्रद्धेवर पूर्ण विश्वास होता. मात्र, २ कोटींच्या बजेटमधील हा चित्रपट २८० कोटींच्या कमाईपर्यंत पोहोचेल, याची कल्पना कोणालाही नव्हती. सुरुवातीच्या तीन थिएटरपासून सुरू झालेला ‘हनुमान अंश’चा प्रवास आता बॉक्स ऑफिसवरील एका अनपेक्षित यशोगाथेत बदलला आहे. (Hanuman Ansh)