Home ब्रेकिंग न्यूज Switzerland Bus Accident : स्वित्झर्लंडमध्ये भीषण अपघात: डच पर्यटकांची बस दरीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू, ४० जखमी

Switzerland Bus Accident : स्वित्झर्लंडमध्ये भीषण अपघात: डच पर्यटकांची बस दरीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू, ४० जखमी

0
Switzerland Bus Accident : स्वित्झर्लंडमध्ये भीषण अपघात: डच पर्यटकांची बस दरीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू, ४० जखमी

स्वित्झर्लंडमधील निसर्गरम्य आल्प्स पर्वतीय भागात पर्यटकांच्या एका लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. सुरक्षा कठड्याला धडकून बस दरीत कोसळल्याने झालेल्या या दुर्घटनेत ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर ४० जण जखमी झाले आहेत. बसमधील सर्व प्रवासी हे नेदरलँड्सचे (डच) नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. (Switzerland Bus Accident)

सुरक्षा कठडा तोडून बस थेट दरीत उलटली

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात पूर्व स्वित्झर्लंडमधील ग्राउबुंडन (Graubunden) प्रांतात, सुश (Susch) आणि झर्नेझ (Zernez) या भागांच्या दरम्यान घडला. झर्नेझ हे स्विस नॅशनल पार्कचे मुख्य प्रवेशद्वार मानले जाते. घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने आधी रस्त्यावरील सुरक्षा कठड्याला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर ती थेट उतारावरून खाली कोसळून उलटली.

https://www.prahaar.in/2026/09/11/the-nation-has-been-shaken-by-the-horrific-accident-in-nanded-prime-minister-modi-has-announced-financial-assistance-of-2-lakh-for-the-families-of-the-deceased-and-50000-for-the-injured/

३ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक, मोठे बचावकार्य सुरू

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढण्यासाठी ७ मदत कार्य हेलिकॉप्टर्स आणि १३ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातातील जखमींपैकी ३ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर उर्वरित ३० जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. (Switzerland Bus Accident)

बसमध्ये सर्व डच नागरिक; टूर कंपनीकडून शोक व्यक्त

जनरल डच असोसिएशन ऑफ ट्रॅव्हल कंपनीजच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसमधून एकूण ४८ प्रवासी प्रवास करत होते आणि हे सर्वजण नेदरलँड्सचे नागरिक होते. ही टूर ‘ओएडी’ (OAD) या ट्रॅव्हल कंपनीमार्फत आयोजित करण्यात आली होती. या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करताना टूर कंपनीने म्हटले आहे की, “या भीषण अपघातामुळे आम्हाला मोठा धक्का बसला असून, आमची पूर्ण सहानुभूती पीडित कुटुंबियांसोबत आहे.”

https://www.prahaar.in/2026/09/11/elephant-trapped-in-a-tire-life-saved-thanks-to-the-forest-departments-strenuous-efforts/

सखोल चौकशीचे आदेश

नेदरलँड्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने या अपघाताची गंभीर दखल घेतली असून परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. दुसरीकडे, स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पारमेलिन (Guy Parmelin) यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत, अपघात नेमका कशामुळे झाला याची निष्पक्ष आणि सर्वसमावेशक चौकशी करण्याचे आदेश स्विस प्रशासनाला दिले आहेत. (Switzerland Bus Accident)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here