Home ब्रेकिंग न्यूज Devendra Fadnavis : छत्रपतींचे अनुयायी हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत! मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत धडकण्याच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : छत्रपतींचे अनुयायी हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत! मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत धडकण्याच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
Devendra Fadnavis : छत्रपतींचे अनुयायी हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत! मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत धडकण्याच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलनासाठी येण्याचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, छत्रपती शिवरायांना मानणाऱ्यांनी हिंदूंच्या सणांमध्ये किंवा गणेशोत्सवात विघ्न आणू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. जरांगे यांच्या मुंबईत धडकण्याच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी, “माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की छत्रपती शिवरायांना मानणारे जे जे आहेत, ते हिंदूंच्या सणांमध्ये किंवा गणपतीमध्ये विघ्न आणणार नाहीत,” असे म्हटले.(Devendra Fadnavis)

https://www.prahaar.in/2026/09/11/the-nation-has-been-shaken-by-the-horrific-accident-in-nanded-prime-minister-modi-has-announced-financial-assistance-of-2-lakh-for-the-families-of-the-deceased-and-50000-for-the-injured/

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे. कुणबी नोंदी आणि मराठा समाजातील बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणींचा कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. याच आंदोलनाच्या पुढील टप्प्यात मुंबईत येण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

मुंबईत जाण्याची तारीख आणि आंदोलनाचा मार्ग निश्चित करण्यासाठी अंतरवाली सराटी येथे बैठक घेण्यात येणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.(Hindu festival Maharashtra)

https://www.prahaar.in/2026/09/11/ganpati-festival-2026-news-central-railway-to-run-12th-september-2026-special-trains-between-mumbai-to-kokan/

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही भाष्य केले. या प्रश्नावर गुरुवारी सविस्तर बैठक झाली असून सकारात्मक चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, काही जण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करीत असून त्यातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.(Devendra Fadnavis)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here