Home महाराष्ट्र कोकण Nitesh Rane News: गणेशभक्तांना घेऊन पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना, मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा

Nitesh Rane News: गणेशभक्तांना घेऊन पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना, मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा

0
Nitesh Rane News: गणेशभक्तांना घेऊन पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना, मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा
first modi express carrying ganesha devotees departed for the konkan region minister nitesh rane flagged it off

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाला यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ची साथ मिळाली आहे. गणेशभक्त प्रवाशांना घेऊन ‘मोदी एक्सप्रेस’ची पहिली विशेष रेल्वे शुक्रवारी दुपारी दादर स्थानकातून कोकणच्या दिशेने रवाना झाली. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी प्रवाशांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत गाडीला निरोप दिला.

गेल्या १४ वर्षांपासून गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे. सुरुवातीच्या काळात बससेवेचे आयोजन करण्यात येत होते. आता विशेष रेल्वेच्या माध्यमातून चाकरमान्यांना कोकणात पोहोचवले जात आहे. यंदा ११ आणि १३ सप्टेंबर रोजी दोन ‘मोदी एक्सप्रेस’ सोडण्यात येणार आहेत. शुक्रवारी पहिली गाडी दुपारी १२ वाजता दादर स्थानकातून रवाना झाली. दुसरी गाडी १३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून सुटणार आहे.

https://www.prahaar.in/2026/09/11/major-relief-for-passengers-travelling-to-their-hometowns-for-ganeshotsav-4-special-trains-to-run-between-mumbai-and-kolhapur/

मुंबईहून सुटलेली ही गाडी रत्नागिरी, वैभववाडी आणि कणकवली कुडाळमार्गे सावंतवाडी येथे पोहोचणार आहे. प्रवाशांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत खाण्यापिण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान भजनी मंडळे आणि भजनाच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा उत्साहही अनुभवता येणार आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री नितेश राणे म्हणाले, ‘गेल्या १४ वर्षांपासून कोकणवासीयांसाठी ही मोफत सेवा सुरू आहे. कोकणवासीयांमुळे आमचे अस्तित्व आणि ताकद आहे. कोकण हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे कोकणातील जनतेची सेवा आणि विकास हाच या उपक्रमामागील हेतू आहे. महायुतीतील घटक पक्षांच्या माध्यमातून देखील बस आणि रेल्वे अशा विविध प्रकारच्या वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे’, असे राणे यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवासाबाबत बोलताना राणे यांनी रस्त्यांची कामे आता मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याचे सांगितले. महामार्गावरील त्रासाचा काही भाग अद्याप शिल्लक असला तरी तो पूर्वीच्या तुलनेत अत्यल्प राहिला असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने मुंबई ते गोवा प्रवासाचा कालावधी पुढील काळात साडेपाच तासांपर्यंत आणण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी नमूद केले. सावंतवाडी एक्सप्रेसमधील फाटलेल्या आसनाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याबाबतही राणे यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकाराची माहिती घेतली असून कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण बोललो आहोत. प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी संबंधित त्रुटी लवकरच दूर केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

मुंबईतून कोकणात जाण्यासाठी आदित्य आणि अमित ठाकरे यांच्याकडून सात बससेवा सुरू करण्यात आल्याच्या प्रश्नावर राणे यांनी उपहासात्मक टीका केली. आपण एकट्याने दोन रेल्वे सोडत असताना दोन नेते मिळून सात-आठ बसेस सोडत असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांच्या कोकणावरील प्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महामार्गाच्या काही भागातील काम अद्याप पूर्ण झाले नसल्याचे आपण मान्य करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आंबा-काजू बागायतदारांच्या ई-केवायसीशी संबंधित अडचणींबाबत राणे यांनी संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे सांगितले. प्रक्रियेत असलेल्या त्रुटी दूर करून काही दिवसांत शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. आंबा-काजू उत्पादकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पॅकेज दिल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

गणेशोत्सव मंडपांचे कंत्राट गैरहिंदूंना देऊ नये, या मागणीसंदर्भात राणे यांनी प्रत्येक धर्माच्या उत्सवांबाबत काही परंपरा आणि नियम असल्याचे सांगत, हिंदूंचे सण हिंदूंच्या माध्यमातून साजरे व्हावेत, अशी भूमिका मांडली. दिशा सालियन प्रकरणातील सीबीआय चौकशीबाबत बोलताना संबंधित याचिकेनंतर न्यायालयाच्या निदर्शनास तपासातील काही त्रुटी आल्याने सीबीआय चौकशी सोपवण्यात आल्याचा माहिती त्यांनी दिली. या प्रकरणात निष्पक्ष तपास होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

https://www.prahaar.in/2026/09/11/fda-action-four-trucks-carrying-paneer-and-khava-seized-in-budhwar-peth-pune/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here