नवी मुंबई: नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन वारंवार शासनाकडून केले जात आहेत. गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले असताना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर इको फ्रेंडली वस्तूंना पसंदी दिली जात आहे. आता अशातच विसर्जनादरम्यानही कृत्रिम तलावांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना केले जात आहे. नैसर्गिक जलस्त्रोतांवर होणारं प्रदूषण रोखण्याचं आवाहन सध्या महानगर पालिकेसमोर आहे. यंदा गणेशमुर्तींचं विसर्जन नैसर्गिक तलावांवर न करता कृत्रिम तलावांवर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
https://www.prahaar.in/2026/09/10/cbi-appoints-investigating-officer-in-the-disha-salian-case-dsp-puran-kumar-appointed-as-the-investigating-officer/
मीरा- भाईंदरनंतर आता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातही कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी कृत्रिम तलावांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने गणेशोत्सवामध्ये १७० कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली आहे. बेलापूर २२, नेरुळ २९, वाशी १६, तुर्भे २१, कोपरखैरणे १६, घणसोली १६, ऐरोली २५, दिघा २५ या परिसरांमध्ये कृत्रिम तलावांची महापालिकेकडून निर्मिती करण्यात आली आहे. सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मुर्त्यांचे आणि मोठमोठ्या मुर्त्यांचेही विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच विसर्जन करण्याचे आवाहन न्यायालयाने नागरिकांना केले आहे.
https://www.prahaar.in/2026/09/10/novelist-vishwas-patil-has-criticized-the-organizers-for-arranging-dance-performances-by-female-dancers-at-the-dahi-handi-event/
नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या घराजवळ असलेल्या सोयीस्कर पडत असणाऱ्या ठिकाणीच आपल्या गणेशमुर्तीचं विसर्जन करावं, असं आवाहन न्यायालयाने नागरिकांना केले आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणपतींच्या विसर्जनावेळी विसर्जनस्थळी भाविकांची गर्दी होते. ही सर्व गर्दी विभागण्यासाठी पालिका प्रशासनाने नागरिकांना कृत्रिम तलावांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. शहरातील नागरिकांना सोयीचे पडणाऱ्या ठिकाणी कृत्रिम तलावांसाठीची जागा परिमंडळ आणि अभियांत्रिकी विभागाने निश्चित केली आहे, तलाव उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
https://www.prahaar.in/2026/09/10/decision-taken-that-the-shiv-sena-group-leader-will-no-longer-sit-in-the-municipal-corporations-standing-committee/
पर्यावरणाचा समतोल राखत गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांनी शाडूच्या आणि पर्यावरण पूरक मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन सुद्धा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. विसर्जनस्थळांवर गणेशभक्तांच्या सुविधेसाठी महापालिकेकडून आवश्यक व्यवस्था केली जात आहे. स्वयंसेवक, जीवरक्षक आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छता, विद्युत व्यवस्था आणि सीसीटीव्हीची सुविधा देखील उपलब्ध केली जाणार आहे. निर्माल्य संकलन आणि वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून तराफे, फोर्कलिफ्ट यांसारखी यंत्रसामुग्रीही सज्ज ठेवण्यात येणार आहे.