Home ताज्या घडामोडी Nashik : ‘Gen Z’ नव्हे, ‘Green Generation’ बना , गिरीश महाजन यांचे आवाहन ; मिशन ग्रीन मॉन्सून द्वारे साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Nashik : ‘Gen Z’ नव्हे, ‘Green Generation’ बना , गिरीश महाजन यांचे आवाहन ; मिशन ग्रीन मॉन्सून द्वारे साधला विद्यार्थ्यांशी संवाद

0
Nashik : ‘Gen Z’ नव्हे, ‘Green Generation’ बना , गिरीश महाजन यांचे आवाहन ; मिशन ग्रीन मॉन्सून द्वारे साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Nashik : आजचा काळ ‘Gen Z’ युवकांचा आहे. त्यांच्या हातात मोबाईल, इंटरनेट आणि इन्स्टाग्रामसारखी आधुनिक साधने आहेत; मात्र केवळ ‘Gen Z’ बनून चालणार नाही, तर सामाजिक बांधिलकी जपत ‘Green Generation’ बनले पाहिजे,” असे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. युवकांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याबरोबरच लावलेल्या वृक्षांच्या संगोपनाची व संवर्धनाची जबाबदारी सुध्दा स्वीकारावी, असेही त्यांनी सांगितले.‘पर्यावरण संवर्धनाचा खरा आणि मुख्य स्रोत हा देशाचा युवक असला पाहिजे’ हा विचार केंद्रस्थानी ठेवून द सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या ऐतिहासिक भोसला मिलिटरी कॉलेज कॅम्पसमध्ये आज ‘उन्नत नाशिक’ अभियानांतर्गत ‘मिशन ग्रीन मॉन्सून’ (Mission Green Monsoon) उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

संस्थेच्या कार्याचे कौतुक करून महाजन म्हणाले, सैनिकी शिक्षणाची गरज ओळखून धर्मवीर डॉ.बा.शि.मुंजे यांनी स्कूल उभारले, देशभक्ती,राष्ट्रनिष्ठेने ध्येयाने प्रेरीत आणि शिस्तबध्द, संस्कारक्षम युवक घडावा हा यामागील दूरदृष्टीकोन होता. संस्था याच उद्देशाने आज कार्यरत आहे, याबद्दल आनंद वाटतो, या कॅम्पसमध्ये येण्याची माझी खूप दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली असेही ते म्हणाले.

https://www.prahaar.in/2026/09/10/simhastha-mahakumbh-mela-2027-extension-of-registration-for-simhastha-mahakumbh-ganesh-mandal-competition/

वृक्षलागवडीबरोबरच संवर्धनही हवे

पुढे ते म्हणाले, युवकांकडे आज तंत्रज्ञानाची ताकद असून त्याचा उपयोग केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता समाज आणि पर्यावरणाच्या हितासाठी केला पाहिजे. वृक्षलागवड ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता वृक्षांच्या वाढीसाठी आणि जपणुकीसाठी सातत्यपूर्ण चळवळ झाली पाहिजे, असे महाजन यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी पतंप्रधानाचे महासत्ता करण्याचे स्वप्न व व्यसनापासून दूर राहण्यास सांगितले.

तिर्थस्थळाचा दर्जा,पावित्र्यही जपावे

गोदावरी ही नाशिकची संस्कृती आहे. रामकुंड आणि दुतोंड्या मारुती ही नाशिकची ओळख आहे. असे नमूद करून ते म्हणाले, देश-विदेशातील भाविकांना नाशिकचे मोठे आकर्षण आहे. त्यामुळे शहराचा तीर्थक्षेत्र म्हणून असलेला दर्जा, त्याची धार्मिक-सांस्कृतिक ओळख आणि पर्यावरणीय समृद्धी आपण जपली पाहिजे. नाशिक शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी प्रशासनासोबत नागरिक आणि विशेषतः युवकांनी अधिक सक्रिय सहभाग नोंदविण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह म्हणाले, दूरदृष्टीकोन आणि शहर विकास डोळ्यासमोर ठेवून विविध योजना आखण्यात आलेल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याची सद्यस्थितीत सुरु असलेली कामे आणि या कामानंतर नाशिकचा चेहरामोहरा बदललेला आपणास दिसले, यंदा १२ कोटी भाविक येणे अपेक्षित असल्याने त्यांना सर्व प्रकाराच्या सुविधा देण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिस आयुक्त डॉ.संदीप कर्णीक यांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तत्पुर्वी मंत्री महाजन यांनी कॅम्पसमधील रामाचे दर्शन घेत वृक्षारोपण केले.

यावेळी आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आडके, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त डॉ. संदीप कर्णीक, संस्थेच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष इंजि.संजय पगारे, सदस्य शितल देशपांडे, नरेंद्र वाणी,कॉलेज कमिटीचे चेअरमन डॉ. विजयप्रसाद अवस्थी, मिथीला देशपांडे, प्राचार्य डॉ.आर.पी.पाटील यांच्यासह अभिनेता चिन्मय उद्गीरकर यांच्यासह विविध अधिकारी,राजकीय क्षेत्रातील लोक उपस्थित होते.