Home देश PM Modi : ‘नाराज फुफाजींना आता काम मिळालं!’ PM Modi यांची विरोधकांवर तुफान टोलेबाजी; नक्की कुणावर साधला निशाणा ?

PM Modi : ‘नाराज फुफाजींना आता काम मिळालं!’ PM Modi यांची विरोधकांवर तुफान टोलेबाजी; नक्की कुणावर साधला निशाणा ?

0
PM Modi : ‘नाराज फुफाजींना आता काम मिळालं!’ PM Modi यांची विरोधकांवर तुफान टोलेबाजी; नक्की कुणावर साधला निशाणा ?

वडोदरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुजरातमधील वडोदरा येथे आयोजित ‘नमो फॉर विकसित भारत’ (Namo For Vikasit Bharat) या कार्यक्रमात ३५ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. या सोहळ्यात आपल्या सरकारच्या विकासकामांचा लेखाजोखा मांडताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. सरकारच्या विकास धोरणांवर शंका उपस्थित करणाऱ्यांना टोला लगावताना त्यांनी ‘नाराज फुफाजी’ असा उल्लेख केला, ज्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे.

२,८०० किमीच्या फ्रेट कॉरिडॉरचे लोकार्पण; कामाच्या पद्धतीची तुलना

या कार्यक्रमात पंतप्रधानांनी २,८०० किलोमीटर लांबीच्या विशेष रेल्वे मालवाहतूक मार्गाचे (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर) उद्घाटन केले आणि याला ‘२१ व्या शतकातील ऐतिहासिक टप्पा’ म्हटले. या प्रकल्पाच्या निमित्ताने त्यांनी भाजप आणि काँग्रेस सरकारच्या कामातील फरक दाखवून दिला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती, मात्र २००४ ते २०१४ या यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या काळात हा प्रकल्प रखडला होता. २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यावरच या कामाला खरी गती मिळाली, असे पंतप्रधान म्हणाले.

https://www.prahaar.in/2026/09/08/major-relief-for-25000-hutment-dwellers-amnesty-scheme-extended-ashish-shelar-issues-directives/

‘नाराज फुफाजींना आता काम मिळाले’ – पंतप्रधानांचा चिमटा

या प्रकल्पाच्या फायद्यांवर प्रश्न विचारणाऱ्यांवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले, “काही नाराज फुफाजी ओरडत होते की आता ट्रक ड्रायव्हर्सचे काय होणार? पण या फुफाजींना आता काम मिळाले आहे.” स्वातंत्र्यानंतरही ज्या भागात रेल्वे लाईन पोहोचली नव्हती, तेथे हा कॉरिडॉर पोहोचत आहे. देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत करून भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत गरजेचा होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘चिप्सपासून जहाजांपर्यंत’ – मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात भारताची भरारी

पूर्वीच्या सरकारवर टीका करताना मोदी पुढे म्हणाले, “२०१४ नंतर भारताने ५०,००० आधुनिक रेल्वे डबे तयार केले, तर पूर्वीचे सरकार १० वर्षांत ५०,००० शौचालयेसुद्धा बांधू शकले नव्हते.” भारत आता मायक्रोचिप्सपासून ते मोठ्या जहाजांपर्यंत सर्व गोष्टींची निर्मिती देशातच करत असून, मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे.