Home ताज्या घडामोडी Mumbai Coastal Road Traffic: कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण अपघात, वाहनांची भलीमोठी रांग; Video

Mumbai Coastal Road Traffic: कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण अपघात, वाहनांची भलीमोठी रांग; Video

0
Mumbai Coastal Road Traffic: कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण अपघात, वाहनांची भलीमोठी रांग; Video
Mumbai Coastal Road Traffic

मुंबई: कायमच सुसाट धावणाऱ्या कोस्टल रोडवर काही वेळापासून वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वीच कोस्टल रोडवर भीषण अपघात झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. टॅक्सी आणि कारचा भीषण अपघात झाल्यामुळे कोस्टल रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. ऐन संध्याकाळच्याच वेळी ही वाहतूक कोंडी झाल्यामुळे ट्रॅफिक पोलि‍सांची चांगलीच तारांबळ उडाली आली आहे.

https://www.prahaar.in/2026/09/08/second-trial-run-of-thane-metro-line-4-has-been-completed-read-the-update-on-when-it-will-commence-operations/

नरिमन पॉईंटहून वरळीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास कोस्टल रोडवर हा भीषण अपघात झाला आहे. अपघात झाल्यानंतर काही वेळातच मुंबई वाहतूक पोलिसांच्या पथकाने अवघ्या काही वेळातच वाहतूक कोंडीची नियंत्रणात आणली. असं असलं तरीही अजूनही कोस्टल रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतच आहेत. सायंकाळची वेळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकरदारांना घरी जाण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागतो.

दक्षिण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारी कार्यालय, निमसरकारी कार्यालये, अनेक संस्था आणि बँकांचे मुख्यालये सोबतच खासगी कार्यालये देखील आहेत. अनेक कार्यालयांची संध्याकाळी सुटण्याची वेळ असते. त्यामुळे कोस्टल रोड आणि वरळी सी लिंक या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची शक्यता जास्त असते. ऐन संध्याकाळच्या वेळेलाच वाहतूक कोंडी झाल्यामुळे सर्वच वाहतूक पोलिसांची धावपळ झाली.