– बारामतीत पुन्हा रंगणार ‘पवार’ कुटुंबातील सामना; युगेंद्र पवारांची स्वतंत्र पॅनलची घोषणा
मुंबई : राजकीय आणि सहकाराच्या पटलावर कायम चर्चेत राहणाऱ्या बारामती तालुक्यात पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ असा चुरशीचा सामना रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. बारामतीमधील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे दोघे आमनेसामने ठाकणार असल्याचे समोर आले आहे. युगेंद्र पवार यांनी या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे करण्याची घोषणा केल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. (Baramati Political Update)
https://www.prahaar.in/2026/09/07/45-day-rule-for-lpg-booking-in-rural-areas-scrapped-cylinders-can-now-be-booked-after-25-days/
याआधी स्थानिक पातळीवरील राजकारण, भाऊकी आणि गावकीचे तट बाजूला सारून सर्वांनी एकजुटीने सहकार पुढे नेण्याचे आवाहन सुनेत्रा पवार यांच्याकडून करण्यात आले होते. मात्र, शेतकरी सभासदांच्या प्रश्नांना प्राधान्य देत आणि त्यांच्यासाठी एक सक्षम व पर्यायी नेतृत्व उभे करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी जाहीर केले आहे. (Baramati Political Update)
https://www.prahaar.in/2026/09/07/pinkys-reign-of-terror-ends-man-eating-tigress-responsible-for-four-deaths-finally-captured/
या घोषणेनंतर आता युगेंद्र पवार लवकरच निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत पवार कुटुंबाच्या विचारधारेशी संबंधित मानले जाणारे दोन प्रमुख गट आमनेसामने येणार असून, बारामतीसह संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे. सहकारी साखर कारखान्याच्या या आखाड्यात रंगणारी ही लढत आगामी राजकीय समिकरणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, दोन्ही बाजूंकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. (Baramati Political Update)