मुंबई : भारतामध्ये कॉर्निया प्रत्यारोपणासाठी मोठी मागणी असताना उपलब्ध नेत्रदानाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. देशाला दरवर्षी सुमारे २.५ लाख कॉर्नियांची गरज असताना सुमारे ५० हजार कॉर्निया उपलब्ध होत असल्याची माहिती AIIMS Patnaच्या तज्ज्ञांनी नुकतीच दिली. त्यामुळे नेत्रदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी विविध उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.
https://www.prahaar.in/2026/09/03/shalarth-id-scam-eighth-arrest-in-shalarth-id-scam-lab-assistant-salunkhe-remanded-to-5-days-police-custody/
याच पार्श्वभूमीवर नेत्ररोग तज्ज्ञांनी वाहन चालवण्याचा परवाना मिळवताना किंवा त्याचे नूतनीकरण करताना नागरिकांना नेत्रदान करण्याची इच्छा आहे का, याबाबत संमती घेऊन ती अधिकृतपणे नोंदवण्याची मागणी केली आहे. अमेरिकेसारख्या देशांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्सशी अवयवदानाची इच्छा जोडण्याची व्यवस्था असल्याचा संदर्भ देत, भारतातही अशा प्रकारची संमती-आधारित प्रणाली विकसित करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
नेत्रदानाची इच्छा आधीच नोंदवली गेल्यास मृत्यूनंतर संबंधित कुटुंब आणि नेत्रपेढीपर्यंत माहिती पोहोचवणे सोपे होऊ शकते. त्यामुळे दानाची प्रक्रिया वेळेत सुरू करण्यास मदत होण्याची शक्यता आहे. रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित समुपदेशक नेमणे, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना योग्य वेळी नेत्रदानाबाबत माहिती देणे आणि नेत्रपेढ्या अधिक सक्षम करणे, अशा उपाययोजनांचीही गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
https://www.prahaar.in/2026/09/03/kidambi-srikanth-continues-his-winning-run-tanvi-sharmas-campaign-ends/
दरम्यान, २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान ४१वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा देशभर साजरा केला जात आहे. याच काळात NOTTOकडून National Cornea Registryबाबतही जनजागृती केली जात आहे. मात्र, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नेत्रदानाची संमती अनिवार्य करण्याचा कोणताही सरकारी निर्णय सध्या झालेला नाही; ही तज्ज्ञांकडून करण्यात आलेली मागणी आहे.