तांत्रिक अडचणी दूर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
https://prahaar.in/2026/08/07/mega-block-on-central-and-western-railways-on-sunday-many-local-train-services-cancelled-routes-of-some-altered/
मुंबई : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांना एकूण ५ हजार २९ कोटी रुपयांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ हजार ५६९ शेतकऱ्यांना एकूण ७ कोटी ७७ लाख ९८ हजार ६४४ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
https://prahaar.in/2026/08/07/politics-heats-up-on-the-streets-of-nashik-girish-mahajan-issues-an-open-challenge-to-raj-thackeray/
या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यात येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. जिल्ह्यात मयत झालेले १६९ शेतकरी, देवस्थान किंवा कबुलायतदार प्रकरणांतील ३३९ खातेधारक, संमतीपत्राने वाटप झालेले २१५ शेतकरी आणि इतर कारणांमुळे २४ शेतकरी अशा एकूण ७४७ शेतकऱ्यांच्या ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. हे शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने शासनाने विशेष सवलत देऊन अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय फार्मर आयडी काढताना येणाऱ्या अडचणी आणि खावटी कर्ज पुरवठ्याबाबतही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून एकही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली.