Home ब्रेकिंग न्यूज Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

0
Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी
Gold medal-winning athlete lashes out at Raj Thackeray.

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूकमुळे पुन्हा एकदा संताप व्यक्त होत आहे. कॉमनवेल्थ गेम्समधील (राष्ट्राकुल क्रीडा स्पर्धा) सुवर्णपदक विजेता खेळाडू दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान अत्यंत संतापजनक अनुभवाला सामोरे जावे लागले. ठरलेली भेट असूनही तब्बल दोन ते अडीच तास ताटकळत ठेवावे लागल्याने अखेर हे दोघेही राज ठाकरे यांची भेट न घेताच माघारी परतले आहेत.

https://prahaar.in/2026/08/06/from-rekha-to-alia-bhatt-these-6-bollywood-beauties-upheld-the-indian-weaving-tradition-on-national-handloom-day/

मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णपदक विजेता खेळाडू दिलीप गावित हे आपले प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्यासह राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. परंतु, वेळ ठरलेली असतानाही त्यांना तब्बल अडीच तास बाहेरच बसवून ठेवण्यात आले. वेळेची विनाकारण उधळण झाल्याने आणि योग्य मान मिळत नसल्याचे पाहून प्रशिक्षक काळे आणि दिलीप गावित अत्यंत नाराज झाले. “भेट द्यायची नव्हती, तर मग बोलावले कशाला?” असा उद्विग्न सवाल उपस्थित करत त्यांनी तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला.

https://prahaar.in/2026/08/06/major-decision-to-pull-the-movie-deool-band-2-from-theatres-director-pravin-tardes-post-goes-viral/

दोघेही निघून जात असल्याचे लक्षात येताच उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. पदाधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु संतप्त झालेल्या गावित आणि काळे यांनी थांबण्यास स्पष्ट नकार दिला. मीडियाशी बोलताना प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी आपली तीव्र खंत व्यक्त केली. “राज ठाकरे हे मोठे नेते आहेत यात शंका नाही, मात्र आम्हीसुद्धा देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी मोठे यश मिळवले आहे. देशाचा तिरंगा जगभरात उंचावणाऱ्या खेळाडूला अशा प्रकारे ताटकळत ठेवणे अत्यंत चुकीचे आहे,” असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. या दुर्घटनेमुळे क्रीडाप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, यावर आता मनसेकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here