Home ब्रेकिंग न्यूज Salman Khan : सलमान खानच्या वजनात मोठी घट, अखेर सत्य आलं समोर

Salman Khan : सलमान खानच्या वजनात मोठी घट, अखेर सत्य आलं समोर

0
Salman Khan : सलमान खानच्या वजनात मोठी घट, अखेर सत्य आलं समोर

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. आता तो चर्चेत आहे घटलेल्या वजनामुळे. सलमान खानच्या वजनात लक्षणीय घट झाल्याचे दिसत आहे. यामुळे सलमानला काही गंभीर आजार आहे का ? अशी चर्चा सोशल मीडियात सुरू झाली आहे. पण या चर्चेला पूर्णविराम देणारी घटना नुकतीच घडली आहे. या ताज्या घटनेमुळे सलमान खानच्या वजनात मोठी घट होण्यामागचं सत्य समोर आलं आहे.

https://prahaar.in/2026/08/03/i-was-a-moderate-hindu-now-i-want-to-become-awakened-kangana-ranaut/

सलमान खान ‘अलायन्स’ या ‘रिअॅलिटी शो’च्या सेटवर गेला होता. तिथे त्याने भाऊ सोहेल खानची भेट घेतली. या भेटीदरम्यान सोहेल खानने शर्ट वर करून सलमानला आपले घटलेले वजन दाखवले. किमान १२ किलो वजन घटल्याचे सोहेलने सलमान सांगितले. यानंतर सलमान खानने १६ किलो वजन घटवल्याचे सांगितले. सलमानने स्वतःच ही माहिती दिल्यामुळे तो आजारी नाही तर एका नव्या प्रोजेक्टसाठी फिटनेस जपत असल्याचे सर्वांना समजले.

https://prahaar.in/2026/08/03/sai-pallavi-famous-actress-turns-down-a-%e2%82%b92-crore-advertisement-deal/

सलमानचा बहुचर्चित सिनेमा मातृभूमी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच किक २ सिनेमावरही काम सुरू आहे. इतर पण काही प्रोजेक्ट आहेत ज्यांच्यासाठी सलमानने फिटनेस जपण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. याआधी सलमान खानच्या वजनात मोठी घट झाल्याचे पाहून काही जणांनी त्याला गंभीर आजार झाल्याची शक्यता व्यक्त केली होती. पण आता सत्य समोर आलं आहे. सलमानने आगामी प्रोजेक्टसाठी फिटनेसवर भर दिल्यामुळे त्याच्या वजनात घट झाली आहे.

https://prahaar.in/2026/07/19/what-happened-to-salman-khans-health-fans-are-worried/

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here