Home महाराष्ट्र ठाणे Devendra Fadnavis : भिवंडी इमारत दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदारावर फौजदारी कारवाईचे आदेश

Devendra Fadnavis : भिवंडी इमारत दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदारावर फौजदारी कारवाईचे आदेश

0
Devendra Fadnavis : भिवंडी इमारत दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदारावर फौजदारी कारवाईचे आदेश

अतिधोकादायक इमारतींमधून नागरिकांना बाहेर काढण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

मुंबई : भिवंडी येथील इमारत दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून, महापालिकेची नोटीस असतानाही दुरुस्तीचे काम सुरू ठेवणाऱ्या कंत्राटदारावर तत्काळ फौजदारी कारवाई करण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. तसेच अतिधोकादायक (सी-१ वर्गवारीतील) इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक असल्यास सक्तीने पावले उचलावीत, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. (Devendra Fadnavis)

https://prahaar.in/2026/07/31/94000-farmers-ineligible-for-loan-waiver-scheme/

भिवंडीतील दुर्घटनेबाबत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ही इमारत अतिधोकादायक घोषित करण्यात आली होती आणि ती रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले होते. महापालिका प्रशासनाने यापूर्वीच सुमारे २५ नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले होते. मात्र, तरीही कंत्राटदाराने त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे दुरुस्तीचे काम सुरू ठेवले आणि ही भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांप्रती शासनाने संवेदना व्यक्त केल्या असून, बाधितांना राज्य शासनाकडून तातडीची आर्थिक मदत दिली जाईल. तसेच जखमींवर रुग्णालयात योग्य उपचार सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  Bhiwandi building collapse

https://prahaar.in/2026/07/31/minister-girish-mahajan-inspected-the-building-involved-in-the-accident-in-bhiwandi-%e2%82%b95-lakh-in-aid-for-the-kin-of-each-deceased-person/

अण्णाभाऊ साठे स्मारकाचे काम ३ वर्षांत पूर्ण करा

यावेळी घाटकोपर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाविषयी माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, चिराग नगर येथील त्यांच्या ऐतिहासिक घराच्या ठिकाणी भव्य व सुंदर स्मारक उभारण्याची अनेक वर्षांची मागणी महायुती सरकारने पूर्ण केली आहे. एसआरएने या प्रकल्पासाठी ४ वर्षांचा कालावधी निश्चित केला होता. मात्र, हे काम ३ वर्षांच्या आत पूर्ण करण्याची डेडलाईन प्राधिकरणाला देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here