राजस्थान : राजस्थानातील जैसलमेर लष्करी तळाजवळ गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात भारतीय लष्करातील मेजर हमजा आरिफ (वय 30) यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत दोन लेफ्टनंट दर्जाचे अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ( Jaisalmer Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही अधिकारी खासगी एसयूव्हीमधून जैसलमेर लष्करी तळाकडे परतत होते. यावेळी अचानक एक उंट रस्त्यावर आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव एसयूव्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर आदळून पलटी झाली. वाहनाचा वेग जास्त असल्याने अपघातानंतर कार सुमारे 100 मीटरपर्यंत फरफटत गेल्याचे सांगितले जात आहे. (Army Major Death)
शेळगी परिसरातील सोलापूर-हैदराबाद महामार्गावर दुर्घटना; 10 प्रवासी गंभीर जखमी सोलापूर : सोलापूर-हैदराबाद (Solapur-Hyderabad) राष्ट्रीय महामार्गावरील शेळगी ...
अपघाताची माहिती मिळताच लष्करी जवान आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनाचा चक्काचूर झाल्याने तिन्ही अधिकारी आत अडकले होते. त्यांची सुटका करून जैसलमेर लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मेजर हमजा आरिफ यांना मृत घोषित केले. (Indian Army)
मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी असलेल्या मेजर हमजा आरिफ यांचे लग्न अवघ्या महिनाभरापूर्वीच झाले होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर आणि लष्करावर शोककळा पसरली आहे. (Rajastan Accident)
पुणे स्टेशन ते मुळशी विशेष बससेवा सुरू; शिवालय मंदिर, जेटी बोटिंग, मुळशी धरण आणि पळसे धबधबा एका ट्रिपमध्ये पुणे : पावसाळ्यात मुळशी (Mulshi) आणि ताम्हिणी घाट ...
या अपघातात लेफ्टनंट अभिनव राठोड आणि लेफ्टनंट आयुष्मान गुसाईन हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताच्या नेमक्या कारणाचा पुढील तपास संबंधित यंत्रणा करत आहेत.






